Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतीच क्रांति ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह स्मृतीदिन मोठ्या उत्साहात संपन्न



दिनांक-१०/०३/२०२२ गुरुवार 
       शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतीच क्रांति ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह स्मृतीदिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे


 मुख्याध्यापक आदरणीय,श्री.एस.ए.कदम व प्रमुख पाहुणे :श्री.राजे सर (मुख्याध्यापक बाभळे) या मान्यवराच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
      यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ही सावित्रीबाई फुले विषयी मनोभाव व्यक्त केलेत .
     शेवटी कार्यक्रम अध्यक्ष महोदय यांनी मनोगतात म्हटले की,अन्न ग्राहक  संरक्षण मंत्रालय मुंबई व मा.शिक्षण उपसंचालक म.रा.पुणे यांच्या पत्रान्वये  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात्वाचा आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानदानाचा ठसा आजच्या पिढीला समजावा म्हणून अध्यक्षांनी म्हटले की,आज आपण पाहतो डाॅक्टर,इंजिनिअर, वकील,पोलिस, शिक्षक व विविध क्षेत्रातील अधिकारी-पदधिकारी, वैमानिक वगैर क्षेत्रातील पदाधिकारी केवळ सावित्रीबाईंच्या या पुण्याईने कारण त्याकाळी त्यांनी शिक्षण घेतले नसते तर या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थीनी व आज ज्या क्षेत्रात काही माताभगिनी कार्यरत आहेत ते केवळ सावित्रीबाई फुले पुण्याईने म्हणून म्हटले जाते की,
" जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उध्दारी!"
उदा.सरोजिनी नायडू,मदर तेरेसा,कल्पनाचावला,सुनिताविल्यम्स, किरणबेदी,इंदिरागांधी,प्रतिभाताई, लक्ष्मीबाई,झाशीचीराणी,अहिल्याबाईहोळकर, राजमाता जिजाऊ,
अनुताईवाघ व साहित्यिक ,तसेच त्यांनी अंधश्रद्धा,केशवपन,
बालविवाह, सतीचीचाल इ.विषयांचे महत्त्व पटवून दिले.
   यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार श्री.आर.बी.गवते यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग व मा.मुख्याध्यापक,  शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments