अमळनेर----श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर द्वारा MSW व BSW प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता ग्रामीण शिबिराचे आयोजन एकरुखी, ता. अमळनेर जि.जळगाव येथे ०८ मार्च २०२२ ते १४ मार्च २०२२ या कालावधीत केले आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुभाषदादा भांडारकर, गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मनिषा ताई भिल, प्राचार्य डॉ पी एस पाटील, उपसरपंच श्री सुरेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले.
या शिबिराच्या माध्यमातून एकरुखी गावात PRA & Micro-Planning या उपक्रमांची अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणार आहे.
शिबिर उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण आणि प्रा. धनराज ढगे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना PRA & Micro Planning या ग्रामीण अध्ययन पद्धतींचे प्रशिक्षण दिले.
उद्या दिनांक 9 मार्च 2022 रोजी सायं. 6.00 वाजता गावात मशाल फेरी व पथनाट्याचे आयोजन शिबिरार्थीं मार्फत करण्यात येणार आहे.
ग्रामीण शिबिराच्या माध्यमातून गावातील विविध समस्यांचे अध्ययन करून गाव विकासाचा सूक्ष्म कृती आराखडा विद्यार्थ्यांन मार्फत तयार करण्यात येणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिबिर समन्वयक प्रा. डाॅ. अस्मिता सरवैय्या, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. अनिल वाणी, प्रा. डाॅ. जे.एस. सोनवणे, लिपिक योगेश संदांशिव, कोमल सूर्यवंशी, तसेच एकरुखी गावातील ग्रामस्थ, महिला, शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांनी किशोर पाटील, रुपाली पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शितल बाविस्कर यांनी मानले.


0 Comments