Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य. विद्यालयात नुकताच जागतिक महिला दिन साजरा



दिनांक ८/०३/२०२२वार मंगळवार    
       शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य. विद्यालयात नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
   या बाबत सविस्तर वृत्त असे की,


माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी.
माध्य.विद्या.कलमाडी या विद्यालयात नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला;तर यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्षआदरणीय,मुख्याध्यापक श्री.एस.ऐ.कदम यांच्या हस्ते प्रथमत:राजमाता जिजाऊ व ज्ञान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.नंतर विद्यार्थ्यांनी "आई माझी मायेचा सागर तिने दिला..जीवनाला आधार "हे गीत गायन केले तद्नंतर शिक्षकांनी महिला दिनाबाबत मनोगत व्यक्त केलेत. 
    शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री.एस.ए.कदम यांनी 
"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी"!
"शिकलेली आई घरादाराला पुढे नेई".
यावेळेस त्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,झाशीचीराणी,
अहिल्याबाईहोळकर,अनुताईवाघ,
आनंदीबाई,साधनाताई आमटे,
सरोजिनी नायडू,मदरतेरेसा,
सिंधुताईसपकाळ,लताताईमंगेशकर,
लक्ष्मीबाई टिळक,बहिणाबाई चौधरी,निवेदिता,कल्पनाचावला,सुनिताविल्यम्स,किरणबेदी,पी.टी.उषा,अरूणाआसफअली,इंदिरागांधी,प्रतिभाताई, संत जनाबाई, संत मुक्ताई, संत बहिणाबाई, वगैर आदी महिलांवरील गौरत्व कार्यत्वाविषयीचे महत्त्व आपल्या जन्म देत्या आईचे ही  महत्व या जागतिक महिला दिनानिमित्ताने पटवून दिले.
यानंतर विद्यालयातील उपशिक्षक जे.डीन.चव्हाण सर यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांच्या मुलीच्या मुलीचा "नित्यश्री" वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी.भदाणे सर यांनी केले तर आभार- सी.जी.वारूडे सर यांनी मानले,यावेळेस
मा.मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद,व विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments