Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबिराचा समारोप




नरडाणा---म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय नरडाणा यांचे राष्ट्रीय सेवा योजना याचे श्रम संस्कार शिबीर मेलाने गावी आयोजित करण्यात आले होते. एन. एस. एस च्या सर्व विद्यार्थ्यांनी या गावात स्वछता मोहीम राबवली. गाव आदिवासी वस्तीत श्रमदान करून सर्वे देखील करण्यात आला. मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवले. या सात दिवस श्रम संस्काराच्या शिबिराचा समारोप करण्यात आला त्यावेळी या कार्यक्रमचे अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील, गावातील ग्रामस्थ श्री. राजाराम गंगाराम बोरसे सरपंच मेलाने, ब्रिजेश दिलीप बोरसे पोलीस पाटील, या कार्यक्रमाचे उदघाटक निंबा यादव बोरसे. सेवा निवृत्त सैनिक, सुधाकर दामू पाटील, प्रताप नथू पाटील, यशवंत विक्रम बोरसे, सुनील पंडित बोरसे, विजय प्रकाश बोरसे, भगवान चैत्राम  बोरसे,सारे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. प्रदीप सोनवणे यांनी केले या श्रम शिबिरास हर्षदा सोनार, मालती मंगळे, निखिल आखाडे, भूषण बोरसे, वाल्मिक भामरे, चेतन बाविस्कर, जागृती चौधरी ललिता पाटील, सचिन सैंदाणे, केशव पाटील, मुदावदकर यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थ व सरपंच, ग्रामसेविका यांनी खूप मदत केली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी रोज भेट देऊन सहकार्य केले. सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.श्रम संस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments