Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा




नरडाणा--मा. सहाय्यक कार्यक्रम सल्लागार, युवक कार्य व क्रीडा मंत्रालय रासेयो कक्ष नवी दिल्ली कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग


 यांच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिवस नरडाणा महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमात महाविद्यालया तर्फे रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, संगीत खुर्ची,100 मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. या


 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे होते. प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील, सरपंच नरडाणा मन्साराम बळीराम बोरसे, उपसरपंच किशोर आत्माराम सूर्यवंशी ग्रामसेवक सागर पाटील हे उपस्थित होते. तसेच जि. प. मराठी शाळा सदस्य व मा. प्रशांत वामनराव सिसोदे, ग्रंथमित्र मा. आर. ओ. पाटील, अरविंद पाटील सर, केंद्रप्रमुख योगेश बेहरे सर, मुख्याध्यापक केंद्रशाळा श्रीमती आशा खैरनार शिक्षिका, श्रीमती संगीता चौधरी, कन्याशाळा मुन्नावर अन्सारी उर्दू शाळा, डॉ. युगंधरा सिसोदे, शबीना साबीर, शोभाबाई महाले, सुमनबाई शिंदे, लताबाई सिसोदे, प्रजापिता ब्राह्मकुमारी नरडाणा केंद्र त्यांचे सहकारी, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, हे सारे उपस्थितीत होते. सर्व स्पर्धाचे परीक्षक म्हणून मा. अरविंद पाटील,  गणेश सोनवणे, प्रा शरद भामरे, वैशाली प्रीतम सिसोदे, ज्योती अनिल सिसोदे, योगेश बेहरे सर, प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी काम पाहिले. आंतरराष्ट्रीय महिला दिवस नरडाणा महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments