Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार विशेष शिबिराची सांगता*



 नरडाणा---ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. भाऊसाहेब मधुकर दिपचंद सिसोदे कला, वाणिज्य व सौ डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय नरडाणा ता. शिंदखेडा जि. धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना


 विशेष शिबिराची दि 06 मार्च 2022 रोजी  सांगता मेलाणे येथे झाली.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब संजयकुमार सिसोदे होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, तसेच कार्यक्रम आधिकारी डॉ. पी जी. सोनवणे तसेच सहा.कार्यक्रम आधिकारी प्रा.डी. एस. ढिवरे  त्याचप्रमाणे गावातील सरपंच राजाराम गंगाराम बोरसे, पोलीस पाटील ब्रिजेश दिलीप पाटील तसेच सुधाकर दामू बोरसे, यशवंत विक्रम बोरसे, गिरधर विक्रम बोरसे, गंपू पाटील,सुधाकर दामू बोरसे,निंबा यादव बोरसे ग्रामसेविका श्रीमती मनिषा शिवाजी पाटील. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाधिकारी डॉ.पी. जी. सोनवणे यांनी गेल्या सहा दिवसात जे काम केले आहे. त्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा प्रास्ताविकातून  मांडला.  यानंतर विद्यार्थ्यांनी गेल्या सहा दिवसात मेलाणे गावामध्ये  जो अनुभव आला त्या अनुभवाचे त्यांनी कथन केले.त्यावेळी अनेक मान्यवर व्यांख्याते आले होते .त्या  मार्गदर्शनाबद्दल त्यांनी त्यांच्या बद्दल आभार व्यक्त केला .आणि आपल्या ज्ञानामध्ये जी महत्त्वाची भर पडली त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विशेष शिबिरात प्रा.आर. एच.पाटील यांनी स्वच्छता अभियान तसेच व डॉ. एस.पी. ढाके यांनी आपत्ती आपत्ती व्यवस्थापन,  डॉ. डी. ए.पाटील यांनी वृक्ष संवर्धन काळाची गरज , डॉ.यु.जी. पाटील यांनी कोरोना आणि मानवी मुल्ये,  तसेच प्रा. एन. एस. सोनवणे यांनी स्पर्धापरीक्षा,प्रा. एस. आर. सोनार यांनी युवकांचीसाठी शिक्षण, डॉ.सी. एस. करंके यांनी आजची तरुणाई आणि समाजव्यवस्था इत्यादी विषयावर मार्गदर्शनपर व्यांख्याने झाली कार्यक्रमाच्या वेळी विभागीय समन्वयक प्रा. डॉ. एम. एस  डोंगरे सर यांनी भेटी दिल्या आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी काही माजी  विद्यार्थ्यी  हजर होते त्यात  हर्षदा लोहार, मालती मंगळे, जागृती चौधरी , ललिता पा.वाल्मीक भदाणे .निखिल आखाडे भूषण बोरसे. कोमल ठाकूर व दिलीप भिल इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात चेतन जाधव  याने मनोगत व्यक्त केले.त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षानी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रगटन  सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.ढिवरे सर यांनी केले आहे . व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने केली

Post a Comment

0 Comments