धुळे : धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या मनोहर टॉकीज जवळील एका कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास केला असता सदर इसम आझादनगर पोलिस ( Police) ठाण्यातील कर्मचारी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
धुळे (Dhule) शहरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासास सुरवात केली असता इसम आझादनगर पोलिस (Azadnagar Police) ठाण्यातील कर्मचारी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. गोविंदा दिघा पारधी असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा कर्मचारी कामावर देखील हजर नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

0 Comments