*शिबीरात ऱ्हदयरोग व मधुमेहाच्या त्रास असणाऱ्या १५० वर रूग्णांची मोफत तपासणी....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील महादेव पुराजवळ असलेल्या श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटरमधील मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन नुकतेच अप्पर तहसीलदार तथा दोंडाईचा नपाचे प्रशासकीय अधिकारी श्री सुदाम महाजन व जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर आनंदा भामरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी शिबीराच्या स्थळी ऱ्हदयरोग तज्ञ डॉ. निलेशकुमार पवार, डॉ. भुषण चौधरी, डॉ. जगदीश चौधरी, डॉ. मनिष गिरासे,डॉ. रामकुष्ण बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबीरात गाव परिसरातुन आलेले अस्थमा-दमा आणि मधुमेह तसेच अन्य रोगाशी संबधित दीडशेच्या रूग्णांची फुफ्फुसांची कार्यक्षमता मापन चाचणी मोफत करण्यात आली. तसेच ऱ्हदयरोग आणि मधुमेहाच्या त्रास असणाऱ्या १५० वर रूग्णांची तपासणी मोफत करून औषधोपचारही करण्यात आला. सदर दोघी चाचण्यांना रूग्णांना बाहेर हजार ते बाराशे रूपये ऐवढा खर्च येणार होता.मात्र श्री गणेशा क्रिटिकल केअर सेंटर मध्ये मोफत करण्यात आल्याने रूग्णांनी समाधान व्यक्त करत हाँस्पीटल संचालकांचे आभार मानले.
यावेळी शिबीरात प्रसिद्ध ऱ्हदयरोग-मधुमेह-दमा तज्ञ डॉ. निलेशकुमार पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर आलेल्या मंडळीचे व रूग्णांचे आभार डॉ. रामकुष्ण बोरसे यांनी मानले.


0 Comments