================================ डोंगरगाव ( प्रतिनिधी) आर आर पाटील== शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा येथील प स सदस्य राजेंद्र देवरे यांचे मोठे बंधू गजानन देवरे हे नरडाणा येथील डीडीसी बँकेत मॅनेजर होते दि 5 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता मोटरसायकलने घरी येताना गोराने फाट्यावर मागून येणार्या चारचाकी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली घटनेची खबर मिळताच नातेवाईकांनी त्यांना धुळे येथे ओम क्रिटिकल सेंटरमध्ये दाखल केले त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता उपचारा अंती रात्री 12 =30 वाजता त्यांची प्राणज्योत संपली त्यामुळे पिंपरखेडा सह परिसरात शोककळा पसरली त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले सुना असा परिवार आहे दिनांक 6 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता शोकाकुल वातावरणात त्यांचा अंतिम विधी करण्यात आला
0 Comments