Header Ads Widget

धुळे पांझरा नदीतून प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान




धुळे : प्लास्टिक कचराच्या विळख्यात अडकलेल्या पांझरा नदीतून प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान अंतर्गत सामाजिक संघटनांतर्फे स्वच्छता अभियान करण्यात आले. प्लास्टीक कचरा मुक्ती अभियानांतर्गत धुळे ( Dhule) शहरात पांझरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे.

शहराच्या मधोमध असलेल्या पांझरा नदी (Panjhara River) पात्रात प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यात अडकली असून नदीकडे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी लावला आहे.

संपुर्ण नदी करणार स्‍वच्‍छ

नदीमधील या प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असल्यामुळे सामाजिक संघटनांतर्फे आज प्लास्टिक मुक्ती अभियानांतर्गत नदीमध्ये साचलेला प्लास्टिकचा कचरा काढून नदी स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी या अभियानामध्ये सामील झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments