Header Ads Widget

ठाकरे सरकारचा निषेध; दोंडाईचात आमदार रावलांचा भव्य मोर्चा



धुळे : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांचे वीज जोडणी जुलमी पध्दतीने कापल्याच्या निषेधार्थ, दोंडाईचा शहरातील व्यापाऱ्यांना दंडाच्या सक्तीच्या नोटीसा पाठवून कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ; यासह अनेक मागण्यांसाठी माजी मंत्री तथा शिंदखेडा ( Shindkheda) मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल ( Jaykumar Rawal) यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचात तहसील कार्यालवर विराट मोर्चा काढून अप्पर तहसीलकार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

मोर्चेकऱ्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाल्याचे बघावयास मिळाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून अक्षरशः शेतकऱ्यांना (Farmer) वेठीस धरण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार तर्फे केला जात असल्याचा आरोप लावत आमदार जयकुमार रावल यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

Post a Comment

0 Comments