Header Ads Widget

धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज जिल्हा न्यायालयात लोक अदालतच्या फिरत्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन



धुळे : धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज जिल्हा न्यायालयात लोक अदालतच्या फिरत्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले आहे. न्याय लोकांच्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून नागरिकांच्या गावात तसेच नागरिकांच्या घरापर्यंत ही व्हॅन पोहोचून जास्तीत जास्त प्रकरण या लोकदालतीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न  धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याला अशाप्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचून लोक अदालतीचे काम काज बघण्यासाठी व्हॅन पुरवण्यात आल्या आहेत. धुळे  जिल्ह्यासाठी देखील ही व्हॅन देण्यात आली आहे. त्यामुळे या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून न्यायनिवाडा करण्याचे काम धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे जिल्हा न्यायाधीशांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments