नरडाणा पिंप्राड अजंदे वि.का.सहकारी संस्थेच्या मावळत्या चेअरमन पांडुरंग मराठे, व्हा.चेअरमन संतोष महाले व संचालकांचा सत्कार करून नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब धनगर व व्हा.चेअरमन रमेश भामरे, संचालक माधुरी सिसोदे, अमृत भामरे, रमेश सिसोदे, सुनिल पाटकरी, जगन्नाथ पाटील, प्रमोदीनी सिसोदे, रविंद्र महाले, शिवाजी भामरे, जिजाबराव वाघ यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन सोसायटी नफ्यात आणून आदर्श निर्माण करू असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जि.प.सदस्य जितेंद्र सिसोदे, रा.काॅ.प्रदेशउपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, माजी सरपंच उपेंद्र सिसोदे, अजंदे सरपंच वसंत भामरे, माजी तंटामुक्त अध्यक्ष ओंकार सिसोदे, ग्रा.पं.सदस्य गणेश मोरे, जिजाबराव सिसोदे, अनिल सिसोदे, युवराज भामरे, अजय भामरे, पवन भामरे आदी. उपस्थित होते.

0 Comments