Header Ads Widget

आषाढी एकादशीनिमित्त, शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची अलोट अशी गर्दी



धुळे : आषाढी एकादशीनिमित्त आज शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची अलोट अशी गर्दी  दर्शनासाठी झाल्याचे बघावयास मिळत आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्याचे दिसून येत आहे. प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीच्या  निमित्ताने यात्रोत्सव भरवला जातो. गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने यात्रोत्सव होऊ शकला नव्हता. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याकारणाने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होत विठुरायाचे दर्शन घेतले आहे.

Post a Comment

0 Comments