Header Ads Widget

सोनगीर येथील दिराने वहिनी सोबत संसार थाटत सामाजिक आदर्श निर्माण



सोनगीर: कोरोनाच्या महामारीत अनेक संसार उद्धवस्त झाले. कोरोनाच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे विधवा झालेल्या आपल्या वहिनी सोबत दिराने संसार थाटला आहे. सोनगीर येथील दिराने वहिनी सोबत संसार थाटत सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. हा विवाह नुकताच सोमेश्वर मंदिरात संपन्न झाला आहे. दरम्यान कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सत्कार केला आहे.
      धुळे तालुक्यातील सोनगीर येथील धनराज गोसावी यांचे दोन वर्षांपूर्वी कोरोनात निधन झाले. त्यांना मुलगी वैष्णवी व मुलगा ओम असे दोन अपत्ये आहेत. वैष्णवी ही आठवी तर ओम दहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत.घरी दोन मुले व तरुण पत्नी ज्योती असे परीवार असताना कोरोनाने पती धनराज ला हिरावले. त्यामुळे ज्योती समोर जिवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता.मुलांचे छत्रछाया हरवली.त्याचे शिक्षण व भविष्याचा विचार करत असताना कुटुंबातील सदस्य व गावातील ज्येष्ठ व्यक्तीनी पुढाकार घेत लहान दिर गुलाब उर्फ आबा ज्ञानगीर गोसावी याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. आणि (ता ७) गुरुवारी सोमेश्वर मंदिरात दिलं गुलाब व वहीनी ज्योती यांचा विवाह झाला. मोठा भाऊ धनराजचे कोरोणा काळात निधन झाल्यानंतर विधवा वहीनी व दोन मुले यांचा उदरनिर्वाह चा प्रश्न सतावत होता.त्यांना पितृछत्र देऊन आधार द्यावा यासाठी विवाह करण्याचा निर्णय घेतला.असे मत वर गुलाब यांनी व्यक्त केले.यावेळी कोरोणा मिशन वात्सल्य समितीचे सचिव तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली देसले, पर्यवेक्षिका जोस्ना पाटील,मिशन वात्सल्य समितीचे सदस्य ईश्वर पाटील यांनी विवाह प्रसंगी शुभेच्छा देत सत्कार केला.तसेच गोसावी समाजातील विधवा महीलेशी विवाह केल्याने यांचा इतर समाजातील नागरिकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले.यावेळी वर गुलाब यांची बहीण उषा गोसावी, कल्पना गोसावी, वधु ज्योती ची आई कोकीळाबाई गोसावी,भाऊ वाल्मीक गोसावी तसेच गोसावी समाज बांधव व नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments