Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील* *धमाणे येथे विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे* *आयोजन* -- *स्त्रियांनी कायद्याचा उपयोग ढाल म्हणून करावा तलवार म्हणून नव्हे - दिवाणी न्यायाधीश अविनाश क्षीरसागर*




        
 शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --
- कायद्याचे संरक्षण सर्वांसाठी आहे. शिक्षित असो, अशिक्षित असो प्रत्येकाला कायद्याचे संरक्षण मिळते. सर्वांना शांततेत जीवन जगता यावे यासाठी न्यायालय सर्वांच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय हे सर्वांपर्यंत पोहचते. स्रियांनी कायद्याचा उपयोग ढाल म्हणून करावा, तलवार म्हणून करू नये. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश दोंडाईचा श्री. अविनाश क्षीरसागर यांनी सांगितले.
 शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे तालुका विधी सेवा समिती, शिंदखेडा अंतर्गत दोंडाईचा व वकील संघ दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. 31 ऑक्टोंबर 2022 ते 13 नोव्हेंबर 20022 या कालावधीत संपूर्ण देशात कायदेविषयक जनजागृती, नागरिकांचे सशक्तीकरण व संपर्क अभियान राबविले जात आहे. 
शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश दोंडाईचा श्री. अविनाश क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे अँड. ई. बी. भावसार, अँड. एन.पी. अयाचित, अँड. पी. जी. पाटील, सरकारी वकील बी.एम.  भामरे, अँड. डी. व्ही.पाटील, अँड. ए. डी. पाटील, अँड. एम.जी.शाह, अँड. आर. एच. धनगर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ऍड एन पी अयाचित यांनी ग्राहक सेवा संरक्षण कायदा विषयी सांगतिले. वस्तू व सेवा घेतांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा असल्याचे सांगितले. अँड.एकनाथ भावसार यांनी कायद्याची व्याख्या सांगितली आपले अधिकार, आपले जबाबदारी यांचे योग्य पालन करणे म्हणजे कायदा.  ऍड पी.जी. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
यावेळी धमाणे सरपंच साकरबाई भिका भिल , उपासरपंच प्रमिलाबाई नथेसिंग गिरासे, पोलीस पाटील निलेश जिजाबराव पाटील, आशा वर्कर सह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक नागराज भिका पाटील यांनी तर आभार अँड. आर.एच. धनगर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments