Header Ads Widget

*शहरातील नागरी समस्यांविरोधात जिल्हा वकील संघाच्या आंदोलना ला शिवसेनेचा पाठिंबा,* *शिवसेना धुळेकरांच्या समस्यांसाठी नेहमीच रस्त्यावर - मा.आ.प्रा.शरद पाटील*






*धुळे*- धुळे महानगर पालिकेत धुळेकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली, गेल्या चार वर्षांत विकास कामांच्या नावाखाली धुळेकरांना नरकयातना भोगाव्या लागल्या, टक्केवारीत ङोळयासमोर ठेवून केलेली विकासकाम निकृष्ट दर्जाची झाली, रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, आरोग्य या सर्वच मुलभुत गरजांच्या प्रश्नावर सत्ताधारी मस्तवाल राहीले, विकास कामांचे मोठमोठे गाजर धुळेकरांना दाखविले, प्रत्यक्षात भुयारी गटार योजना असो की अक्कलपाङा पाणीपुरवठा योजना या योजनेचे बारा वाजविण्यात भाजपेयीच आघाङीवर राहिले, भाजपाच्याच नगरसेवकांना स्थायी समितीत असो वा महासभेत लोकांना तोंङ दाखवायला जागा नाही आता तरी प्रश्न सोङवा हे ओरडून ओरडून सांगावे लागले ,शहराच्या समस्या सुटण्यास मदत होण्या ऐवजी त्यात दररोज भर पङतेच आहे, अशा अवस्थेत सामाजिक बांधीलकीतुन धुळे जिल्हा वकील संघाने महानगर पालीके विरोधात आंदोलनाचा इशारा देत ,न्याय पालिकेत धुळेकरांच्या समस्यांवर वाचा फोङली, जिल्हा वकील संघाने आक्रमक भुमिका घेत महीना भराच्या आत समस्या  सोडवाव्यात असा अल्टीमेटम दिला, वकील संघाने घेतलेल्या या भुमिकेचे शिवसेना धुळे वतीने जोरदार स्वागत करण्यात येवुन आज शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधंळे मा. महापौर भगवान करनकाळ मा.आ. प्रा.शरद पाटील,महानगरप्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, विधानसभा संघटक ललित माळी, समन्वयक भरत मोरे, शिवसेनेच्या विधी आघाङीचे विधीतज्ञ राजेश गुजर यांच्या नेतृत्वात जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात अध्यक्ष विधीतज्ञ रामकृष्ण जोशी, मा. अध्यक्ष दिलीप पाटील, शामकांत रावजी पाटील, उपाध्यक्ष  भिसे,प्रभा माळी, रसीका निकुंभ सचिव दिनेश गायकवाड, जेष्ठ विधीतज्ञ दिक्षीत, बापुसो महेता, आदींसह अनेक मान्यवर विधीतज्ञ उपस्थित होते, या प्रसंगी शिवसेना पक्षा वतीने सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, व मा. आ.प्रा. शरद पाटील यांनी शिवसेनेचा आंदोलनाला पांठीबा देत, धुळेकरांच्या नागरी मुलभुत समस्यांकरीता शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलना सर्दंभात विस्तृत माहीती देत, धुळेकरांच्या समस्यांसाठी  शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरूनच आंदोलन केली आहेत, भविष्यात वकील संघाने आवाज दिल्यास खांद्याला खांदा लावुन कुठलाही राजकीय स्वार्थ ङोळयासमोर न ठेवता सोबत राहु असे आश्वासन दिले, या प्रसंगी शिवसेनेचे मच्छिंद्र निकम, संदिप सुर्यवंशी, विनोद जगताप, प्रविण साळवे, कैलास मराठे,छोटुभाऊ माळी सुनिल चौधरी,राजु ढवळे, मुन्नाभाई पठाण, दिनेश पाटील, योगेश पाटील, लक्ष्मण बोरसे, आदी उपस्थित होते. 


आपला 
धीरज पाटील 
महानगरप्रमुख शिवसेना

Post a Comment

0 Comments