भडणे(प्रतिनिधी):-शिदखेडा तालुक्यातील भडणे येथे कानुमाता रोट उत्सव आयोजित करण्यात आला होता.वाजत गाजत कानुमातेच आज दि.२१सोमवारी शांतमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी गावात सर्वत्र भक्ती मय वातावरण दिसून आले तीन दिवस चालणाऱ्या या उत्साहात बाहेरगावातून आलेले गावकरी यांनी दर्शनाचा लाभ घेतला व घरातील नवविवाहित मंडळीनी सह पत्नी कानबाई मातेची पूजन करण्यात आले भडणे येथे चार वर्षापासून प्रथमच रोट करण्यात आल्याने सर्वत्र आनंदी वातावरण दिसून आले
दि.१९ते२१ या तीन दिवसाच्या कानुबाई -रानुबाई रोट उत्सव आयोजित करण्यात आला.गावात वाजत गाज देवीची मिरवणुक काढण्यात आली.परंतु भडणे परीसरात केवळ कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.एवढच नव्हें तर पिके वाळु लागली आहेत.नदी नाले कोरडे ठाक असल्याने,दुष्काळ सदृष्य परीस्थीती दिसुन येत आहे. पंचक्रोशीतील बळीराजा सध्या संकटात सापडला असल्याने,आज कानुमातेला संकट घालण्यात आले.जोरदार पाऊस येवु दे.बळीराला सोन्याचा दिवस येवु दे.भरपुर उत्पन्न येवु देवु. अशा शब्दांतुन देवीला संकट घालण्यात आले.
सकाळी ८वाजे पासुन कानुमातेची मिरवणुक काढुन वाजत गाज गावाबाहेरील नदीपात्रात विसर्जन झाले.
0 Comments