⬇️⬇️ *महत्वाचे* ⬇️⬇️
आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा *श्रीमती. माया परमेश्वर* यांनी राज्याचे महिला व बाल विकास सचिव *डॉ. अनुप कुमार यादव* यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली. बैठकीत झालेल्या चर्चे मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
➡️ नवीन मोबाईल च्या प्रश्नांवर बोलताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल लवकरच मिळतील. त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. असे सांगण्यात आले.
➡️ मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा या करिता, संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
➡️ याबाबत मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी चा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आलेला आहे. तो लवकरच पूर्ण होईल आणि पुढे पाठविण्यात येईल. त्यानंतर केंद्राकडून त्यावर निर्णय घेण्यात येईल. आणि भविष्यात मिनी अंगणवाडी केंद्रांच्या मधून नियमित होणाऱ्या केंद्रांवर नव्याने मदतनीस यांचीही भरती होईल. याबाबत माहिती मिळाली.
➡️ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन च्या मुद्यावरही काम सुरू असून त्याबाबत संघटनांची बैठक घेण्यात येईल. असेही प्रसंगी सांगण्यात आले.
➡️ टीए डीए, सीबीई, अंगणवाडी केंद्रांचे भाडे, सेवा समाप्ती लाभ अशा व इतर सर्व प्रकारच्या थकीत देयकांबाबत माहिती घेऊन लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशी माहिती मा. सचिव - महीला व बाल विकास यांनी प्रसंगी दिली.
शिष्टमंडळामध्ये अध्यक्षा श्रीमती माया परमेश्वर व सुधीर परमेश्वर यांचा समावेश होता.
युवराज बैसाणे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी एका प्रसिद्ध पत्रकार कळवले आहे
💐💐💐🪷🪷💐💐💐
0 Comments