Header Ads Widget

पाटण चे भूमिपुत्र पुरस्कारांनी सन्मानीत! भूमिपुत्रांच्या पाठीवर 'गावकऱ्यांची 'ची शाबासकीची थाप


संदीप पवार (मंत्रालय मुबई) यांचा सत्कार करताना ,कुणाल पाटील,शामकांत सनेर ,रामकृष्ण पाटील,अर्चना पवार

ग्रामपंचायत’ या भव्यदिव्य सोहळा पाहून भूमीपुत्र भारावले 
१००विशेष मान्यवरांचा सत्कार 
गावातील सैन्यदलातील आजी माजी सैनिक,सामाजिक, आरोग्य,  सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, धार्मिक  व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा  शानदार सोहळ्यात *पाटण भूषण* पुरस्कार
देऊन सन्मान करण्यात आला

 प्रतिनिधी:-
पाटण ग्रामपंचायत तर्फ  सामाजिक, राजकीय, , सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा येथील आशापुरी मंदिराच्या हॉल मध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात ‘गौरव भूमिपुत्रांचा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील,शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे,सरपंच अर्चना पवार,ग्रामसेवक विजय जाधव,पोलीस निरीक्षक दीपक पाटील,माजी आमदार रामकृष्ण पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शंकरराव कोल्हे साखर कारखाना चे मुख्य लेखाधिकारी  सुभाष नीलकंठ पवार,
 यांच्या हस्ते भूमिपुत्रांचा गौरव झाला.  विशाल पवार यांनी प्रास्ताविकात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांनी आपले गाव सोडले आणि देशातील विविध ठिकाणी जाऊन ही मंडळी आपापल्या क्षेत्रात यशोलौकिकाचे शिलेदार ठरली. मात्र, तरीही त्यांची नाळ आपल्या मातीशी आजही तितकीच घट्ट आहे. अशा भूमिपुत्रांचा गौरव करणे आमचे कर्तव्य होते.  एखादे ध्येय उराशी बाळगून आपले गाव सोडायचे आणि दुसऱ्या गावात, शहरात जाऊन ध्येयापर्यंत पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत या भूमिपुत्रांनी आपापली यशकथा साकारली आहे. याच यशकथा नव्या पिढीसमोर याव्यात आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सोहळा  आहे. या मातीत जन्मलेल्या कर्तृत्ववानांचा कौतुक सोहळा याच भूमीत झाला पाहिजे. भूमिपुत्रांचा गौरव-सन्मान ज्या भूमीत होतो त्यासारखा आनंद आणि समाधान देणारी बाब कोणतीच नसते. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना जोपासत समाजातील ही रत्न समाजापुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.
 १०० भूमीपुत्रांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
-----------
 मा.आमदार कुणाल पाटील: माणसाच्या अंगी जिद्द असेल तर काहीही साध्य होत असते. इच्छाशक्ती प्रबळ असून उपयोग नाही, मेहनत करण्याची मानसिकता यशाचा पल्ला गाठून देते. छोट्याशा गाव खेड्यातील माणूस आज राज्याच्या,परराज्यातील कानाकोपऱ्यात नावलौकिक मिळवतो, हे शिक्षणामुळे शक्य झाले. ग्रामीण भागातील गुणिजनांना गौरव करण्याचा ‘ग्रामपंचायत’चा उपक्रम स्तुत्य आहे. आपण ... प्रत्येक क्षेत्रातील हिरे शोधून त्यांना प्रेरित केले. प्रत्येक वर्षी  अशा उपक्रमासाठी पुढाकार घेतल्यास समाजातील कर्तृत्ववानांच्या कार्याला बळकटी मिळेल. तसेच त्यांचा हुरूप वाढेल. 
राजकीय व्यक्ती पेक्षा अश्या कर्तृत्ववान व्यक्ती कडून मिळालेली प्रेरणा अधिक प्रभावशाली असते, 
सैन्यदलातील आजी माजी सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्ती ना जवाहर फाऊंडेशन च्या माध्यमातून सर्वच आजारांवर मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले.
-----------
सुनील पवार(पोलीस निरीक्षक)  पाटण चा  भूमिपुत्र असल्याचा मला अभिमान आहे. जिद्द व तळमळीने काम करण्याची निष्ठा या भागातील माणसांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील असल्याने मला संवेदनशीलतेची जाणीव आहे. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत. ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत घ्या. भूमिपुत्रांचा गौरव करून कर्तृत्ववानांचे कार्य समाजापुढे आणण्याचे काम विशाल पवार यांनी  केले आहे.  त्यांच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

 

-----------------------------..यांचा झाला विशेष गौरव :
संदीप पवार: प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवत सामान्य शिक्षकाचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयात मोठ्या पदावर आहेत. गावातील लोकांना मुंबई येथील शासकीय तसेच आरोग्य कामासाठी सतत प्रयत्नशील असतात.
रामकृष्ण पवार:नक्षलवादी भागात तब्बल १७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून नागरिकांचे रक्षण करणारे  पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल.
सुनील पवार:  सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन अभ्यास, चिकाटी आणि परिश्रमातून पोलीस निरीक्षक पदापर्यंत सुनील हंसराज पवार यांनी मजल मारली. 
महेंद्र परदेशी:गोवा येथे उद्योजक म्हणून यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत, त्यांनी योग या विषयावर इंग्लंडमधील पार्लमेंटमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या उपस्थितीत व्याख्यान दिले,
----–-----------
सन्मानर्थी मध्ये :भारतीय सैन्य दलातील ४०आजी माजी सैनिक,  कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक, प्राध्यापक, शिक्षक, वकील,डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, प्रशासनातील अनेक अधिकारी,कर्मचारी,गावातील धार्मिक ,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर,ग्रामपंचायत कर्मचारी, बचतगटाच्या कर्मचारी, आशा स्वयंसेवीका,

Post a Comment

0 Comments