Header Ads Widget

कुरुकवाडे श्रीराम पंचायतन देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव




कुरूकवाडे येथील नागपंचमी या शुभमुहूर्तावर श्रावण मासानिमित्त या पवित्र मासामध्ये पुण्याचा सहभागी होऊन संपूर्ण कुरूकवाडे व 


पंचक्रोशीतील भाविक भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने माता-भगिनींनी रामायण कथेचा अतिशय सुंदर पद्धतीने आनंद व मनमुराद भक्तीची गंगा कुरूकवाडे गावात वाहू घातली तसेच आदित्यराणूबाई कानुबाईचा ही उत्सव सुरू असल्यामुळे अत्यंत भाविकांनी रसाळ अशा कथेमधून श्रवणीय आनंद घेऊन रामाच्या चरित्राचे रामचरितमानस हे गुणगान करत असताना कथाकार बाळकृष्ण दीक्षित महाराज पुढे म्हणाले की प्रथम दिवशी रामाची भेट रामाचा दासच करून देऊ शकतो म्हणून हनुमंता शिवाय राम कधीही भेटू शकत नाही म्हणून पहिल्यांदा रामाची प्राप्ती करायची असेल तर रामाच्या भक्ताचे पाय पकडायचे असतात म्हणून अशा या रामभक्त हनुमंताने तुलसीदासजिना चित्रकुटामध्ये रामचंद्रांचे दर्शन व लखन महाराजांचे दर्शन घडवलं आणि अयोध्ये मध्ये रामचरितमानस ग्रंथ लिहून १६३१ मधील हा ग्रंथ काशीमध्ये कथेचा त्यांनी उपसंहार केला तसेच महाराजांनी भरद्वाज यांची तीर्थराज प्रयाग क्षेत्रामध्ये भेट झाली आणि तिथून रामायणाची कथा प्रारंभ झाली भगवान शिवजी माता पार्वती श्रद्धा रुपेरी पार्वती माता आणि विश्वास रुपीस भगवान शिव यांची कथा एका अक्षय वटाखाली सुरू होते आणि ही राम कथा रामाचं दर्शन करून आलेल्या आणि रामाचं सदैव अखंड नामस्मरण करणाऱ्या भगवान शिवांना राम कळला पण माता पार्वतीला अजून राम कळला नाही म्हणून त्या भ्रमात आहेत इथपर्यंत बाळकृष्ण महाराजांनी कथा सांगितली पुढील कथा उद्या सांगितली जाईल आणि आपण सर्वांनी श्रीराम कथेचा आनंद घ्यावा जय श्रीराम

Post a Comment

0 Comments