अमळनेर : मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल म्हणत संपूर्ण विधानसभा वेठीस धरून विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या तत्कालीन मुलुख मैदान तोफ माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील वय ९० यांचे २२ रोजी सायंकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ रोजी दुपारी २ वाजता दहिवद ता अमळनेर येथून निघणार आहे.
गुलाबराव पाटील तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा , सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवन्त पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.
0 Comments