Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा*




        नरडाणा येथील म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. संजयकुमार सिसोदे यांनी भूषवले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. जी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. एस पी. ढाके यांनी केले.वन्यजीव संरक्षण सप्ताह निमित्त पोस्टरच्या माध्यमातून सर्प बद्दल समज, गैरसमज, विषारी, बिनविषारी सर्प बद्दल माहिती देऊन सर्पदंश होता वेळीच कोणती काळजी घ्यावी या विषयी सविस्तर माहिती देता त्याचे प्रात्यशीक कल्याण पाटील व सहकारी यांनी दिली. यावेळी वनरक्षक मंडलिक साहेब, थोरात साहेब, सर्पमित्र कासार नरडाणा, अविनाश पाटील दीपाली धनगर तसेच महाविद्यालयाचे वरिष्ट प्राध्यापक वृंद, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments