*आदी अंतर्गत ए.बी.सी.डी.रस्ते दुरूस्त करा...*
*क्राकींटकरण रस्ता अगोदरच जिंवत असताना, पुन्हा सहा इंच क्राक्रींटीकरण वाढल्यास,ए.बी.सी.डी.ब्लाॅकमध्ये घाण पाणी साचून रहिवासी लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे न.पा.स सुचना...*
*अगोदर,ए.बी.सी.डी. ब्लाॅकमधील नैसर्गिक व घाण पाणी निचरा होण्यासाठी अंतर्गत रस्ते व गटारीची मागणी,तरच रस्त्याचे नुतनीकरण करण्याचा इशारा...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील प्रभाग क्रमांक एक व वार्ड क्रमांक मधील विवादीत-बोगस क्राक्रींटीकरणावर क्राक्रींट तयार होणाऱ्या रस्त्याबाबात, स्थानिक रहिवासी नागरिक यांनी दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेत तक्रार दिली असुन,अगोदर काॅलनी अंतर्गत रस्ते -गटारी तयार करा, त्यानंतर मुख्य रस्ता काक्रींटकरणावर काक्रींट करा, अन्यथा हा अगोदरच जिवंत असलेला काक्रींट रस्त्याचा सहा इंच थर वाढल्यास रहिवासी लोकांच्या घरात घाण पाणी येऊन -साचून, निचरा होणार नाही व जिंवत माणसांचे आरोग्य धोक्यात येईल,अशी सुचना नगरपालीकेस केली आहे.मात्र विकास कामांच्या ठिकाणी फलक-पाट्या न लावता, तसेच कामांचा निविदा स्वरूप-आकडा लपवत, काक्रींटकरणावर काक्रींट बोगस रस्ता तयार करण्याचा व जनतेचा पैशांचा हिशोब न द्यायचा ठेका घेतलेल्या भष्ट्र प्रवुत्तीपुढे वार्ड क्रमांक एकमध्ये अंतर्गत रस्ते,घाण पाणी,निचरा,गटार बनवून आता जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे का? काक्रींटकरणावर काक्रींट रस्ता बनविणे महत्वाचे आहे?,हे लवकरच स्पष्ट होईल.म्हणुन मा.जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे बोगस काम थांबवुन, जनतेच्या समस्या सोडवले तर बरं होईल,अशी अंतर्हाक वार्ड क्रमांक एकमधील लोकांच्या तोंडून निघत आहे.
याबाबत वार्ड क्रमांक एकमधील रहिवासी लोकांनी दिलेली तक्रार अशी की,१) आम्ही खाली सह्या करणारे हे दोंडाईचा नगरपालिका हद्दीमधील वार्ड क्र. १ सिंधी कॉलनी भागातील ब्लॉक बी व ब्लॉक सी मधील राहणारे रहिवासी नागरिक आहोत. साहेब, सिंधी कॉलनी वसाहतीत ए.बी.सी.डी असे चार ब्लॉक असुन सदरहु वसाहतीत जाणेकरिता जुना शहादा रोडला जोडलेला पक्का सिमेंट कांक्रीटचा रस्ता असुन सदरहू अंतर्गत मुख्य रस्ता हा ए.बी.सी.डी. ब्लॉक मधोमध पुर्वेकडून पश्चिम दिशेला जातो. तर सदरहु अंतर्गत मुख्य रस्ताच्याकडून ए.बी. सी. डी ब्लॉककडे जाणेकरिता प्रत्येक ब्लॉक साठी उत्तर दक्षिण असे जुने सिमेंट कांक्रीटचे रस्ते बनविलेले असुन सदरहु ब्लॉकचे रस्त्याची निर्मिती ही अस्तित्वातील मुख्य रस्ता बनविण्याचा अनेक वर्षापुर्वी झालेली होती व आहे.
२) दरम्यान ए, बी, सी, डी ब्लॉक मधील अतर्गत रस्ते आजपावेतो दुरुस्तीअगर नुतनीकरण झालेले नाहीत. उलट अंतर्गत रस्तापश्चात मुख्य रस्ता सिमेंट कांक्रीटचा तयार करतेवेळी मुख्य रस्ता हा अंतर्गत रस्त्यापासून सुमारे १. ते सव्वा फुट उंचीवर बनविण्यात आलेला आहे. त्यास्तव आजरोजीचे स्थितीत ए.बी.सी.डी ब्लॉक मधील अंतर्गत रस्त्यावरील पावसाचे अगर सांडपाणी निचरा होणेकरिता कुठलिही योग्य व्यवस्था न झाल्यामुळे दशकापूर्वीची गटारीमधुन काहीसा पाण्याचा निचरा होऊन उर्वरित पाणी रहिवासी लोकांचे घरासमोर साचून त्यातून दुर्गंधी पसरून परिसरात डास व घाणीचे साम्राज्य निर्माण होत असते. पर्यायाने डेंगु, मलेरिया आदि आजार पसरण्याचा धोका असतो व आताही काॅलनीत काही आजारी रूग्ण आहेत.
३) अशातच मागील काही दिवसांपासुन सिंधी कॉलनीतील अस्तित्तातील मुख्य सिमेंट कांक्रीट रस्त्याचे नुतनीकरणाचे काम नगरपालिका वतीने ठेकेदार यांनी सुरू केलेले आहे आणि सदरहू कामामुळे अस्तित्वातील रस्ताचे वर नविन सुमारे ६ इंच उंचीचा थर टाकून रस्ता नुतनीकरण करण्यात येत आहे. त्यास्तव वरील स्थितीत आधीच खोलवर असलेले ए.बी.सी.डी ब्लॉक मधील अंतर्गत रस्ते अधिक खोल होत आहेत
४) साहेब, महत्वाची बाब म्हणजे आम्ही खाली सहया करणारे नागरिक बी व सी ब्लॉक मधील राहणारे असून बी व सी ब्लॉक दरम्यानचा रस्ता हा मुख्य रस्त्यापासून सर्वाधिक खोल आहे. त्यात आजरोजी सुद्धा साचत असलेले घाण पाणी दर्शविणारे रंगीत फोटो सोबत जोडले आहेत. त्याकरिता नुतनीकरण रस्त्याचे कामामुळे आमचे घरासमोरील ब्लॉक मधील अंतर्गत रस्ता हा मुख्य रस्त्यापासून सुमारे दीड फुट पेक्षा जास्त खोल होणार आहे. तथापि, सदर ठिकाणी पाण्याचा निचरा होणेकरिता कुठलीही नगरपालीकेची ठोस उपाययोजना -व्यवस्था नसल्यामुळे आमचे घरा शेजारी सर्वास जास्त घाण पाणी साचुन आमचे परिवाराचे स्वास्थ्य धोक्यात येणार आहे.
५) त्यामुळे वरील परिस्थितीत मुख्य रस्ता नुतनीकरण द्वारे ६ इंच उंचीवर होत असताना आमचे बी व सी ब्लॉक मधील अंतर्गत दक्षिण उत्तर रस्तामधील पाण्याचा निचरा होईल अशा प्रकारची उपाययोजना-व्यवस्था करणे व त्यानंतर रस्ता नुतनीकरण करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रस्तुतचा तक्रारी अर्ज सादर करीत आहोत
६) तरी हुजुर महोदयांना नम्र विनती की, वरील तक्रारीची गांभीर्यता लक्षात घेऊन आमचे बी व सी ब्लॉकमधील अंतर्गत रस्त्याची पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करून त्यानंतर मुख्य रस्त्याचा नूतनीकरण पुढील काम करण्यात यावे,असे शेवटी तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी निवेदनावर श्री श्रवण कुमार परसराम चैनानी,विजय रूपचंदाणी, अर्प्रित रूपचंदाणी,अर्जुन टिलाणी, घनशाम टिलाणी,विक्की टिलाणी, जयकुमार चैनानी, पंकज चैनानी,अमीत टी.वालेचा, प्रकाश कुकरेजा,गगन कुकरेजा,दिलीप कुकरेजा, अनिल वालेचा, महेश रोहडा,गोपी कुकरेजा आदीच्या सह्या आहेत.
0 Comments