शिरपूर उपविभागातील शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील ५२ गावांच्या पोलिसपाटीलपदांचे आरक्षण बुधवारी (ता. ६) जाहीर करण्यात आले. प्रारंभी आरक्षण निश्चित करून प्रवर्गानुसार महिलांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
शिरपूर उपविभागात शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात पोलिसपाटलांची एकूण २६९ पदे मंजूर असून, त्यांपैकी २१७ जागांवर पोलिसपाटील कार्यरत आहेत.
उर्वरित ५२ गावांच्या पोलिसपाटीलपदांचे आरक्षण काढण्यासाठी येथील तहसील कार्यालयात सकाळी अकरापासून आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. (Reservation for post of Police Patil of 52 villages announced in shirpur dhule news)
प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी, शिंदखेडा येथील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी पी. पी. ढोले, भामरे उपस्थित होते.
प्रांताधिकारी भामरे, तहसीलदार माळी यांनी लोकसंख्येनिहाय आरक्षणाची माहिती दिली. ५१ पैकी १४ गावे पेसा क्षेत्रात असल्याने तेथे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले. पेसा क्षेत्राबाहेर असलेल्या ३६ पैकी नऊ गावे अनुसूचित जाती, सहा गावे अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती (ड गट) साठी दोन, आर्थिक दुर्बल घटकांसाठी चार, तर १५ गावे खुल्या गटासाठी निश्चित करण्यात आली.
भटक्या विमुक्त जमाती (ड गट)ची पुरेशी लोकसंख्या नसल्यामुळे त्या गावांचे आरक्षण भटक्या विमुक्त जमातीच्या क गटासाठी निश्चित करण्यात आले. त्यानंतर आरक्षित गावांपैकी महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले. डिंपल योगेश चौधरी या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पेंढारकर यांनी आभार मानले.
: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
Dhule News : स्थायी समितीसह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; कुत्रे निर्बीजीकरणही 'फेल'शिरपूर उपविभागातील गावनिहाय आरक्षण असे ः
पेसा क्षेत्र (शिरपूर तालुका) : वडेल खुर्द : अनुसूचित जमाती, भोईटी : अनुसूचित जमाती, बुडकी : अनुसूचित जमाती, चिलारे : अनुसूचित जमाती (महिला), काकडमाळ : अनुसूचित जमाती, गधडदेव : अनुसूचित जमाती, हेंद्र्यापाडा : अनुसूचित जमाती (महिला), हिंगोणीपाडा : अनुसूचित जमाती, हिवरखेडा : अनुसूचित जमाती, फत्तेपूर (कनगई) : अनुसूचित जमाती, अभाणपूर खुर्द : अनुसूचित जमाती, ममाणे : अनुसूचित जमाती (महिला), वरझडी : अनुसूचित जमाती, वासर्डी : अनुसूचित जमाती (महिला), हिसाळे : इतर मागास प्रवर्ग, वाडी खुर्द : अराखीव.
अनुसूचित जाती : सावेर (ता. शिरपूर), सावळदे (ता. शिरपूर, महिला), सतारे (ता. शिंदखेडा), भोरखेडा (ता. शिरपूर), रहीमपुरे (ता. शिंदखेडा), लोंढरे (ता. शिरपूर, महिला), अमळथे (ता. शिंदखेडा), वरपाडे (ता. शिंदखेडा), विखरण (ता. शिंदखेडा, महिला).
:अनुसूचित जमाती : कलवाडे (ता. शिंदखेडा), गोदी (ता. शिरपूर), भिलाणे दिगर (ता. शिंदखेडा), तांडे (ता. शिरपूर, महिला), अक्कडसे (ता. शिंदखेडा, महिला), सुलवाडे (ता. शिंदखेडा).
भटक्या विमुक्त जमाती (क) : जातोडे (ता. शिरपूर, महिला), पाष्टे (ता. शिंदखेडा).
आर्थिक दुर्बल घटक : सार्वे (ता. शिंदखेडा), अजंदे खुर्द (ता. शिंदखेडा), अर्थे खुर्द (ता. शिरपूर), अर्थे बुद्रुक (ता. शिरपूर, महिला).
अराखीव : नांथे (ता. शिरपूर), अजंदे बुद्रुक (ता. शिरपूर), पढावद (ता. शिंदखेडा), बाभळे (ता. शिंदखेडा, महिला), दलवाडे प्र.सो. (ता. शिंदखेडा), सोंडले (ता. शिंदखेडा), अजंदे बुद्रुक (ता. शिंदखेडा, महिला), कामपूर (ता. शिंदखेडा, महिला), पाटण (ता. शिंदखेडा), दाऊळ (ता. शिंदखेडा, महिला), शिराळे (ता. शिंदखेडा), निमगूळ (ता. शिंदखेडा), जुने भामपूर (ता. शिरपूर, महिला), पिंपरखेडा (ता. शिंदखेडा), दभाषी (ता. शिंदखेडा).
0 Comments