Header Ads Widget

धुळ्याला सल्लागार अभियंत्याला 25 हजाराची लाच घेताना अटक



धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याचे वाढीव बांधकामाचा नकाशा मंजूर करून देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सल्लागार अभियंत्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.

तक्रारदाराचा औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड आहे. या भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्याकरीता नकाशा मंजूर होण्यासाठी त्यांनी औद्योगिक वसाहतीचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज सादर केला होता. यासाठी चलनाद्वारे आवश्यक ती देखील भरण्यात आली होती. मात्र अर्ज सादर करून बराच कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांच्या अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजूर न झाल्याने ते कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले. यावेळी सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांच्या समवेत त्यांची भेट झाली. यावेळी त्यांनी 25 हजारांची लाच मागितली. त्यामुळे संबंधित तक्रारदार व्यावसायिकाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून ही तक्रार दिली होती. औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाजवळ पैसे घेताना पकडण्यात आले.

:

Post a Comment

0 Comments