शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद पदयात्रा हा कार्यक्रम आज दोंडाईचा विभागात सुरू असताना आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचे भिल समाज विकास मंच चे जिल्हा सचिव अशोक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष राहुल ताराचंद ठाकरे यांनी पदाधिकारीच्या वतीने काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणालबाबा पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर उपस्थित होते. निवेदनाद्वारे शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आदिवासी भिल समाजाला तात्काळ रेशनकार्ड विनाअट मिळावे. आदिवासी महिला डिलेवरी झाल्यास त्यांच्या मुलांचे जन्मदाखला लवकर मिळत नसल्याने त्यांचे आधारकार्ड काढण्यास अडचणी येतात.त्यामुळे तात्काळ जन्मदाखला मिळावा तसेच आधारकार्ड काढण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी चा दाखला ग्राहय धरण्यात यावा. त्याचप्रमाणे 50 वर्षापासून ज्या जागेवर आदिवासी भील समाज अतिक्रमण करुन राहत आहे. त्या जागेचा सिटी सर्वे अंतर्गत 7/12 उतारा मिळावा. आदी मागण्या आदिवासी भिल समाजाच्या आहेत. निवेदन स्विकारुन आ. कुणालबाबा पाटील यांनी आपल्या दोंडाईचा येथील आदिवासी समाजाच्या मागण्या रास्त आहेत. त्या लवकरच मार्गी लावू असे भिल समाज विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांना दिले. हयावेळी जिल्हा सचिव अशोक सोनवणे, दोंडाईचा शहराध्यक्ष राहुल ताराचंद ठाकरे , उपशहरप्रमुख भटु विश्राम मालचे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोक सोनवणे, अवचित बागुल, बुधा ठाकरे, गुलाब मोरे, आकाश ठाकरे, चंदु सोनवणे, कृष्णा पवार, सोन्या भिल , दिपक सोनवणे, विजय बागुल आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments