Header Ads Widget

*अक्कडसे ग्रामपंचायती च्या सरपंच पदी रवींद्र सैंदाणे यांची बिनविरोध निवड:*




                शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- तालुक्यातील अक्कडसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रवींद्र सैंदाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सरपंचाचे स्वागत  गटनेते रावसाहेब सैंदाणे व निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका धनगर यांनी सत्कार केला.  यासंदर्भात अधिक वृत्त असे की,शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच प्रतिभा रमेश बागुल यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंच पदासाठी  सकाळी दहा ते बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी रवींद्र पुंडलिक सैंदाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्याचे सुचक सदस्य गणेश सैंदाणे होते. सरपंच पदासाठी रवींद्र सैंदाणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  वर्षी महसूल मंडळ अधिकारी मोनाली धनगर यांनी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. त्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.  निवडणूक निर्णय बिनविरोध व्हावी म्हणून  गटनेते रावसाहेब सैंदाणे यांनी अतोनात प्रयत्न केले होते.  तलाठी कविता पाटील, ग्रामसेवक छाया पवार,यांनी मदत केली विशेष बैठकीला उपसरपंच खटाबाई सैंदाणे सदस्य,प्रतिभा बागुल,रजू बाई धनगरे,गोविंद सैंदाणे व गणेश सैंदाणे हे सदस्य उपस्थित  होते. सभा संपल्यावर गटनेते रावसाहेब सैदाणे सह सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच रवींद्र पुंडलिक सैदाणे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रवींद्र सैदाणे हे बिनविरोध निवडून आल्याने अक्कडसे गावासह परिसरातुन कौतुक होत असुन शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments