बेटावद --काल दि ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय
कार्यासाठी वर्ष २०२३ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.त्यात बेटावद येथील माहेर असलेल्या व सद्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या निर्देशक स्वाती योगेश देशमुख (स्वाती साहेबराव पवार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक मोबाईल App,उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती,दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार'वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी,डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
त्या बेटावद येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव दगाजीराव पवार व सौ विजया साहेबराव पवार यांच्या कन्या आहेत तसेच त्यांचे सासर हे द्याने (मालेगाव) येथील आहे.
सदर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments