समाजवादी पार्टीचे फलक अनावरण महाराष्ट्र राज्याचे महासचिव परवेज भाई सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले हयावेळी महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष मायाबाई चौरे , युवा प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद , महासचिव जमील मन्सुरी , धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी , यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर समाजवादी पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील हयावेळी केले. त्यानंतर शहरातून जनसंवाद यात्रा भव्य रॅली काढण्यात आली. हयाप्रसंगी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी यांनी केले. मार्गदर्शन करताना महासचिव परवेज भाई सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्ष मायाबाई चौरे यांनी सांगितले की, अबु आझमी चे हात बडकट करा. समाजवादी पक्षाची धुळे जिल्हा सह शिंदखेडा तालुक्यात ताकद वाढवा. समाजवादी पार्टी चा प्रत्येक निवडणूका मध्ये उमेदवार उभे करा आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन हयावेळी करण्यात आले. हयाप्रसंगी जाकीर शेख , इरमान शेख सदर , डॉ. युनिस कुरेशी, जलाल शेख रज्जाक, रहीम खान पठाण, हमीदा पोलीस, गुलाम हुसेन खा , उवेद खा , डॉ शाकीर कुरेशी , उसमान अशारफी , मोसीन मन्सुरी , संजुम खाटीक , शकीला मनियार , तनवीर खाटीक, जावेद मनियार , एजाज कुरेशी, शाकीर लोहार , जहुर शेख , तालीब कुरेशी, डॉ. वसीम कुरेशी, आसीफ कुरेशी, गाजी आबा , इमरान कुरेशी, करीम धोबी , फिरोज खान, नदिम शेख , तालीब सलिम कुरेशी, बापु गिरासे, रजेसिंग सिसोदे, पप्पु शेख , हारुन खा , आदी समाजवादी पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments