दिनांक:-५/०९/२०२३वार-मंगळवार
सुजान नागरिक (प्रतिनिधी-सी.जी.वारूडे)
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात ' शिक्षक दिन ' मोठ्या उत्साहात संपन्न झाला; यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांनी प्रथमतः विद्येची आराध्य देवता सरस्वती माता व डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.नंतर शिक्षक दिनात सहभागी विद्यार्थी - यश योगेश्वर झालसे(मुख्याध्यापक)व उपशिक्षक - शैलेश पाटील,डिगंबर पाटील,अंकुश पाटील,कु.मयुरी पाटील,कु.अनिता पाटील,कु.दिव्या पाटील,कु.साक्षी पाटील इ.व शिक्षकेत्तर कर्मचारी चंद्रकांत पाटील(क्लार्कभाऊसाहेब),
अश्विन पाटील,साई पाटील,निलेश जाधव,प्रशांत पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनात सहभागी होऊन ५ सप्टेंबर या दिवसाचा कार्यभार सांभाळणाऱ्या नवनिर्वाचित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीयांचे व धुळे जिल्हास्तरीय शालेय नेटबाॅल क्रीडा स्पर्धेत १७वयोगटातील मुलींच्या संघाने धुळे जिल्हा स्तरावर नेटबाॅल क्रीडा स्पर्धेत उपविजेता यश संपादन करणार्या संघातील मुलींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांनी गुलाबपुष्प देवून कौतुकास्पद अभिनंदन केले
नंतर विद्यार्थ्यांनी भाषणे झालीत व नवनिर्वाचित सहभागी शिक्षकांनी ही आपआपले अध्यापनाचा एका दिवसाचे अनुभवाचे मनोगत व्यक्त केलेत.
त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक-
श्री.पी.आर.पाटील,श्री.जे.डी.चव्हाण,श्री.एस.एस.पाटील,श्री.सी.जी.वारूडे,श्री.आर.बी.गवळे,श्री.एस.बी.भदाणे,श्रीमती बी.जे.कदम मॅडम,या सर्वांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचार प्रणालीवर मनोभाव व्यक्त केलेत.
तद्नंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करत असतांना म्हणालेत की,"कोणतेही काम हलके मानु नका तर सकारात्मक दृष्टी ठेवणं हे कोणत्याही कार्यातील निम्म यश असतं" म्हणूनच अपेक्षा मोठ्या बाळगल्या तरच मोठे ध्येय साध्य होते.कारण स्वातंत्र्य,स्वाभिमान,स्वावलंबन आणि स्वाध्याय ही चार तत्त्वे अंगीकारले म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहेत कारण प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरू असतो...पण माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो.
१] शिक्षक हा शिक्षण क्षेत्रातील तीर्थ आहे.
२] शिक्षक हा विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक आहे.
३] शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे.
४] शिक्षक हा सृजनशील विचारवंत आहे.
५] शिक्षक हा धडपडीचे व्यासपीठ आहे.
६] शिक्षक हा नैतिक मूल्यांचा मानदंड आहे.
७]शिक्षक हा शिक्षणाचा आधार स्तंभ आहे.
समाजात म्हटले जाते -
संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकेल तर शास्र टिकेल शास्त्र टिकेल तरच राष्ट्र टिकेल!
वरील इ.विषयीचे महत्त्व पटवून देतांनाशारीरिक,बौद्धिक,मानसिक,भावनिक,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक तसेच स्वच्छता व पर्यावरण संवर्धन इ.विषयीचे महत्त्व विविध उदाहरणासह पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :-विद्यार्थीनी शिक्षिका कु.मयुरी भागवत पाटील यांनी केले तर आभार :-विद्यार्थी मुख्याध्यापक - यश योगेश्वर झालसे यांनी आभार मानले;शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments