Header Ads Widget

*शिंदखेडा शहरातील श्रीजी अभ्यासिकेने घडवले ३२ तरूणांचे आयूष्य.*




शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- या आधी पंचवीस आणि आता पून्हा सात अशा एकूण ३२ तरूणांच्या आयूष्यास कलाटणी देण्यास येथील श्रीजी अभ्यासिका कारणीभूत ठरली. अभ्यासिकेत तासनतास अभ्यास करून आता पून्हा सात तरूणांनी पोलीस परीक्षेत यश मिळवले. या सात तरुणांचा  अभ्यासिके तर्फे आज सत्कार करण्यात आला. 
अभ्यासिकेचे आणि अभ्यासिकेची सूविधा शिंदखेड्यात मोफत उपलब्ध करून देणारे 
सूनिल चौधरी यांचे आभार व्यक्त करतांना या तरूणांचे डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले होते.
त्यांनी अभ्यासिकेला कधी विसरणार नसल्याचे सा़ंगितले.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की, शिंदखेडा शहरातील विरदेल रोड लगत असलेली श्री जी अभ्यासिका २०१७ मधे सूरू झाली.  कॉग्रेसचे माजी नगरसेवक सूनिल चौधरी आणि त्यांचे बंधू प्रल्हाद चौधरी यांनी स्वतःचे लाखो रूपये खर्च करून शहरातील तरूणांसाठी  ही सूविधा मोफत उपलब्ध करून दिली. अभ्यासिकेत पाच हजारांहून जास्त पूस्तके आहे. खूर्च्या ,प़खे ,लाईट पाणी ,आणि पूस्तके हे सारे मोफत आहे.
गरीब आणि होतकरू मूल़ं गेल्या सहा वर्षांपासून या अभ्यासिकेचा लाभ घेत आहे. आतापर्यंत २५ तरूणांनी या अभ्यासिकेत अभ्यास करून विविध क्षेत्रात यश मिळवून मोठ्या पदांवर ते कार्यरत झाले आहे.
आता पून्हा याच अभ्यासिकेचे सदस्य असलेल्या सात तरूणांची पोलीस भरती प्रक्रियेत विविध पदांवर निवड झाली.  त्यांचा आनंद चेहऱ्यावरून 
आज ओसंडून वाहतांना दिसत होता..
त्यांचा  अभ्यासिकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उप निरीक्षक प्रशांत गोरावडे होते. तर प्रा.सूरेश देसले , प्रा.जी.पी.शास्त्री, दिपक देसले 
प्रमूख पाहूणे होते. प्रा.देसले यांनी शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती असल्याचे सांगून ही संपत्ती जपण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. सूनिल चौधरी यांनी अभ्यासिकेची माहिती देवून आपल्या यशाने अभ्यासिकेचे सार्थक होत असल्याचे सांगितले.
भविष्यकाळात ही अभ्यासिका तूमच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. प्रशांत गोरावडे यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. योगेश चौधरी यांनी आभार मानले. यावेळी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेश माळी ,राजेंद्र मराठे ,निलेश देसले ,जिवन देशमुख ,गोटू ठाकुर ,गणेश खलाणे आदी उपस्थित होते.
-------------------------------------
 *विविध पदांवर निवड झालेले सत्कारार्थी तरूण असे.* 
१) हंसराज प्रकाश जाधव-बी.आर.ओ.म्हणून निवड.
२)सागर सूरेश लोंढे (मूंबई पोलीस चालक)
३) अधिक दौलत चौधरी (महाराष्ट्र सूरक्षा दल)
४) मनोज रविंद्र महाले-(बी.एस.एफ.)
५) नंदलाल वसंत साळू़खे.(मूंबई लोहमार्ग पोलीस)
६) उमेश भास्कर सोनवणे (पालघर पोलीस)
७)मयूर सूरेश सोनवणे (बी.एम.सी.फायरमॅन)

Post a Comment

0 Comments