Header Ads Widget

*जनता हायस्कूल मध्ये दहीहंडी उत्सव साजरा*




 शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या  


वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रम प्रसंगी संस्थाउपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे सचिव श्रीमती मीराताई मनोहर पाटील प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने, ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  
    कार्यक्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णा, तरकाही विद्यार्थिनींनी राधा, गोपिका, तर काही सुदामा व सवंगड्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या . याप्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर केले.दहावीवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दहीहंडीचे थर लावत दहीहंडी फोडली.   उत्सवात वाद्य संगीताची साथ असल्याने विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्य गीतांवर ठेका धरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए टी पाटील श्री एस ए पाटील यांनी  तर मान्यवरांचे आभार श्री बी जे पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एस के जाधव,श्री जे डी बोरसे,श्री एल पी सोनवणे,श्री डी एच सोनवणे,श्री शेखर भामरे,श्री डी के सोनवणे श्रीमती एन जी देसले श्रीमती पी एस पाटील श्री मनीष माळी श्री मनोज मराठे श्री अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले. 
   अत्यंत उत्साहाने व आनंदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments