दोंंडाईचा प्रतिनिधी- दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी स्वर्गीय डॉ. रवींद्रनाथ डोणगावकर यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्ताने भोईराज शै.,सा.व सांस्कृतिक युवा मंच संचलित श्री राजा गणपती मित्र मंडळाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात आज 50 हून अधिक रुग्ण ऍडमिट होते यापैकी शस्त्रक्रिया विभागात वीस महिला रुग्ण होते.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.श्री. मावचे, ज्येष्ठ पत्रकार जे पी गिरासे,जनमतचे पत्रकार दौलत सूर्यवंशी, अहिल्या वार्ताचे संपादक सुनिल धनगर, ऍडव्होकेट संतोष भोई आदी मान्यवर उपस्थित
होते. आयोजन भोईराज युवा मंच संंचलीत श्री. राजा गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जीवन भोई, सदस्य प्रफुल रामोळे, संदीप वाडीले,अनिल वाडीले, सुरेंद्र रामोळे, पंकज निकवाडे,भरत निकवाडे,पावबा रामोळे, राकेश साटोटे,नरेंद्र वाडीले आदींंनी केेेले तसेच सुखदेव ढोले, भरत खेडकर,किशोर मोरे, जयेश मोरे,विशााल भोई,हितेश ढोले, शुभम भोई,सागर भोई गोलू भोई,कैलास कोळी,राहून ढोले आदींचे सहकार्य लाभले. यावेळी जीवन भोई यांनी सांगितले की, भोईराज शै.,सा. व सांस्कृतिक युवा मंच संचलित श्री. राजा गणपती मित्र मंडळाची स्थापना १९९० ला मी (जीवन लक्ष्मण भोई) व स्व.प्रभू राजाराम रामोळे यांंनी केली. श्री राजा गणपती मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून मागील 33 वर्षांपासून विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्य करीत आले आहे. मंडळातर्फे दरवर्षी महाप्रसाद भंडार्याचे आयोजन केले जाते. हजारो भाविक महाप्रसाद भंडार्र्याचा लाभ घेतात.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्य सहभागी होतात.यंदा मंडळ ३४ वे वर्ष साजरे करणार आहे त्या अनुषंगाने गणेशोत्सवापुर्वी आज दि.७ सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या गावातील सुप्रसिद्ध सर्जन,ज्यांच्या नावाने आपल्या दोंंडाईचा गावाची ओळख देश- परदेशात होत असते व ज्यांनी दोंंडाईचा शहराचे नाव सर्वदूर पोहोचवले व दीर्घकाळ वैद्यकीय क्षेत्रासह ईतर विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला असे कर्मयोगी डॉ. नानासाहेब टोणगांंवकर यांच्या त्रुतीय स्मृती दिनाच्या निमित्ताने दोंंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात राजा गणपती मंडळातर्फे उदात्त हेतूने रुग्णांना फळ वाटप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
0 Comments