Header Ads Widget

ह.भ.प. भिमराव हुला पाटील यांचे 84व्या वर्षी हृदयविकाराने निधन




तांदळी (आ. अमळनेर)- अमळनेर तालुक्यातील तांदळी गावाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. आबासाहेब भिमराव हुला पाटील यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 होते. त्यांनी आयुष्यभर धार्मिक विचारांचे आचरण केले. आपले वडीलांचा वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांनी पुढे चालविला. तब्बल 11 वेळा त्यांनी पंढरपूरला वारी केली होती होती. ते उत्कृष्ठ हार्मोनियमवादक होते. सर्व भजने त्यांची तोंडपाठ होती. आपल्या गोड सुरात ते भजन म्हणत असत.  एखाद्या व्यक्तीचे गावात निधन झाले तर त्यांना आवर्जून बोलावले जाई. नाडी ओळखून ते निधनाचे निदान करीत. गावात कुणाकडेही जेवणावळीचा कार्यक्रम असला तर साहित्य किती लागेल याची त्यांच्याकडे विचारणा होई.  गाव निर्व्यसनी रहावे यासाठी ते कायम प्रबोधन करीत असत. गावातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्ती, हाडाचे शेतकरी हरपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अन्त्ययात्रा उद्या शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता तांदळी येथून निघेल. स्व. भिमराव आबा यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. तांदळीचे प्रगतीशील शेतकरी, भिकन पाटील, गोटीराम पाटील, नरेंद्र पाटील त्यांचे ते वडील होते.

 


Post a Comment

0 Comments