Header Ads Widget

*शिंदखेडा येथे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठीमाराचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा - शिंदखेडा शहर कडकडीत बंद*




               शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर अमानुषपणे लाठीचाराचा मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष अरुण देसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढुन  तर शिंदखेडा शहर कडकडीत बंद ठेवुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायब तहसिलदार शारदा बागले यांना पदाधिकार्यांनी निवेदन दिले. यासंदर्भात अधिक वृत्त असे की, गेल्या काही दिवसापूर्वी जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष पणे लाठीहल्ला केला त्यात शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे शिवाय त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.त्या निषेधार्थ त्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चा चे अध्यक्ष अरुण देसले यांच्या नेतृत्वाखाली पावसाच्या रिमझिम सरीत भगवा चौकापासून ते शिवाजी चौक थेट तहसील कार्यालयावर काळे झेंडे दाखवत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या अकार्यक्षम विषयी भव्य मोर्चा काढुन नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले . निवेदनाद्वारे वरील झालेला प्रकार अंत्यत निंदनीय आहे. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज शिंदखेडा तालुका या प्रकाराचा जाहीर निषेध करत तिव्र आक्रोश नोंदवीत असुन मराठा समाजावर असा अमानुष प्रकार खपवुन घेतला जाणार नाही. याची शासनाने दरबारी नोंद घेण्यात यावी.तसेच मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.मराठा समाजाला संपुर्ण पणे आरक्षण मिळावे.तसा अदयादेश काढण्यात यावा. लाठाहल्ला करणाऱ्या दोषी पोलीसांना निलंबित करा. तसे न झाल्यास मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज तिव्र जन आंदोलन करणार असल्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आला. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवित अकरा दिवसापासुन सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन शासनाने अटीशर्तीसह त्वरित सोडवावे. यासाठी शिंदखेडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. त्यास व्यापारी, भाजीमंडई, सह सर्वच लहान मोठे व्यवसायिक दुकानदारांनी पाठिंबा दर्शवित मोर्चा मध्ये सहभागी झालेत. हयावेळी अरुण भिकनराव देसले, सर्जेराव पाटील, उल्हास देशमुख, स्वप्नील देसले, अमोल मराठे, संतोष देसले,विनायक पवार, संदीप पवार, राजेंद्र मराठे, ॲड. विनोद पाटिल, रवींद्र पाटील, नंदकिशोर पाटील, गणेश मराठे,रावसाहेब देसले, उमाकांत देसले, अजय मराठे, गोलु देसले, महेंद्र मराठे, चेतन अविनाश देसले, हुसेन भदाणे, अतुल पाटील, प्रदीप देसले, चेतन विश्वासराव देसले, हिमांशू पाटील, आयुश देसले,भुषण पवार, कार्तिक देसले, गुलाबराव पाटील, किरण महंत, बापु मिस्तरी, बाळा शिंदे, किशोर पवार, अनिल मराठे, अनिल कापुरे,प्रकाश देसले,गोविंद मराठे, अक्षय देसले, निलेश पाटील, सुनील गुरव,आदी सह शेकडोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाले होते. शहरातील इतर संघटनेचे पदाधिकारी पाठिंबा देत सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments