================================== डोंगरगाव,,( प्रतिनिधी )आर आर पाटील = धुळे जिल्ह्यात सुमारे चार आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने टप्प्याटप्प्याने काही ठिकाणी आपली हजेरी लावत काही भागात जोरदार व मुसळधार पावसाची सुरुवात केलेली आहे मागील दोन दिवसात साक्री तालुक्यातील पांझरा नदी परिसरात व धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात पाच हजार क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येत आहे वरील धरण क्षेत्रात पाऊस अजून पडत राहिला तर हा पाणी प्रवाह अजून वाढू शकतो म्हणून आत्ताच शासनाने डोंगरगाव येथील सोनवद धरणात पांझरा नदीवरील स्थित सोनवद पोहोच कालव्यामार्फत हे जास्तीत जास्त पाणी या धरणात टाकावे जेणेकरून या परिसरातील भविष्याचा पिण्याचा पाण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो म्हणून जलद गतीने हे सर्व पाणी सोनवद धरणात टाकावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी केलेले आहे
0 Comments