मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.
मालपूर हे शिंदखेडा तालुक्यातील मोठया लोक वस्तीचे गाव आहे येथे 36 जाती धर्माचे गाव गुण्यागोविंदाने नांदत आहेत. याच पाश्वभुमीवर संयमी, लोकाभिमुख, सुशांत स्वभावाचे ग्रामविकास अधिकारी श्री. तुषार साळवे साहेब ' गेल्या चार वर्षापासून प्रशासन काळात ग्रामपंचायतीची धुरा सांभाळत आपले कामाची पावती साक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेबांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली ही बाब त्यांच्यासाठी गौरवाची आहे
वेळप्रसंगी साळवे यांच्यावर अनेक लोकांनी बदनामीचे चिखलफेक केली. त्यांचा कागदोपत्री त्रास दिला पण ते न डगमगता आपले काम एकनिष्ठेने करत राहिले हाच त्यांचा धिरोदात पणा सिद्ध होतो. ग्रामपंचायतीचे विकास
कामे आजही सुरूच आहेत. चार वर्ष विना सरपंच पद असतांना प्रशासन काळात आपली प्रतिष्ठा पणाला लावून, वेळ प्रसंगी अपमान सहन करून आपले ड्युटि करत राहिले. मध्यंतरीच्या काळात त्यांचा मोठा अपघात घडला त्यात पायाला दुखापत झाली तरी देखील त्यांनी ग्रामपंचायत चे काम इनामें इतबार ने केलीत व त्यांचा भगवंता प्रति दृढ विकास होता कि मी केलेल्या चांगल्या कामाची मला निश्चीत फळ मिळेल. आणि आज मिळालेच. अशा कर्तथ दक्ष ग्रामविकास आधिकारी तुषार साळवे साहेबांचे मालपूर गावकऱ्यांकडून पुनशच्छ आभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments