Header Ads Widget

*विकासकामांना विरोध करणाऱ्यांचा निषेधार्थ शिंदखेडा तालुका दक्षता समितीचे जनआक्रोश आंदोलन*


शिंदखेडा प्रतिनिधी - मतदारसंघातील दोंडाईचा–सोनगीर रस्ता, सायने–सवाई मुकटी–रेवाडी–दिवी रस्ता,यांसह एम.आय.डी.सी.देगांव येथील प्रकल्प, मेथी येथील सोलर प्रकल्प अश्या विविध विधायक विकासकामाना काही राजकीय मंडळी व पदाधिकारी विरोध करून अधिकारी व ठेकेदारांना ब्लॅकमेल करीत
 विकास कामांना अडथळा निर्माण करीत आहेत.या विकासविरोधी कारवायांचा निषेध करण्यासाठी कामपूर येथे शिंदखेडा दक्षता समितीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले.या आंदोलनात परिसरातील सर्व पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर
 नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.शिंदखेडा मतदार संघातील सुरू असलेली विकासकामे काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक अडथळा आणून थांबविल्याचा आरोप करत दक्षता समितीच्या वतीने व परिसरातील नागरिकांनी अपर तहसीलदार राजेश घोलप यांना निवेदन दिले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिंदखेडा मतदार संघात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातून रस्ते, पूल, वीज, पाणीपुरवठा तसेच अन्य अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली आहे.परंतु, काही विरोधी मंडळींनी केवळ राजकीय हेतूने या कामांमध्ये आडकाठी आणल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 राजकीय अस्तित्व गमावलेल्या व नेहमी आंदोलन,उपोषणाच्या नावाने प्रशासन व ठेकेदारांना वेठीस धरून ब्लॅकमेल करणे, तोड्यापाणी करणे असे प्रकार घडत आहेत त्यांना वेळीच आवर घालून विकासकामांना गती मिळावी अशी मागणी दक्षता समिती व परिसरातील सर्व सरपंच, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,शेतकरी, शेतमजूर नागरिक यांनी केली आहे.विशेषतः दोंडाईचा–सोनगीर रस्ता, सायने–सवाई मुकटी–रेवाडी–दिवी रस्ता,यांसह एम.आय.डी.सी.देगांव येथील प्रकल्प,मेथी येथील सोलर प्रकल्प आदी कामे सुरू असून देखील अडथळ्यांमुळे त्यांची गती मंदावली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.जर अश्या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात 'जोडो मारो आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला. या जन आक्रोश आंदोलनात दिपक वसंतराव बागल, डी. एस. गिरासे, नथा आबा वारुडे, जितेंद्र गिरासे,भुपेंद्र गिरासे, धनंजय मंगळे, प्रभाकर पाटील, विक्रम तायडे, मा.सभापती रणजित गिरासे, कामपूर सरपंच इंजी विष्णू पाटील, वाल्मिक बागूल, रणजित गिरासे, प्रकाश पाटील,चेतन पाटील, सिध्दार्थ सिसोदे,विनीत सिसोदे, ऋषी पाटील, वकील पाटील,बबलू कोळी, आननसिंग गिरासे, योगेश गिरासे, रवींद्र पाटील, भरत गिरासे, किरण बागल, चंद्रसिंग गिरासे, पांडुरंग सुभाष पाटील, महेंद्र गिरासे, दंगल पाटील, गोविंदसिंग गिरासे, मोतीलाल पाटील, गोरख गिरासे, नथा पाटील कोमलसिंग गिरासे, संजय बोरसे, सुनील पाटील, देविदास पाटील, जयसिंग गिरासे, शिवदास धनगर, देविदास ठाकरे, भाईदास बडगुजर, चिंधा पाटील, राहुल राजपूत, महेंद्र पवार यांसह परिसरातील सर्व गावांतील ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी, शेतकरी शेतमजूर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments