शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश मा.श्री. एम.आर कायस्थ साहेब यांचा हस्ते 11 देशी वृक्षांचे लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिंदखेडा शहर व परिसरात वृक्ष संवर्धन समिती ने अनेक वृक्षांची लागवड करून संवर्धन केले आहे. शिंदखेडा येथील दिवाणी न्यायालयातील मोकळ्या जागेत 11 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यात वड, पिंपळ, निंब, बदाम, जांभूळ या झाडांचा समावेश आहे.
याप्रसंगी न्यायाधीश श्री कायस्थ साहेब यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले. वृक्ष लागवड करून संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, राजेंद्र मराठे, जीवन देशमुख, भूषण पवार, रोहित कौठळकर, यश मराठे, प्रदीप चतुर्वेदी, दिपक पाटील, हर्ष गुप्ता, प्रेम मराठे, ध्रुव सोनार, तुषार माळी, प्रेम गिरासे, चेतन चौधरी, मयूर माळी सह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वृक्ष संवर्धन समितीने घेतली आहे.
0 Comments