-----------------------शिंदखेडा येथे एस.एस.व्ही. पी.एस महाविद्यालयात जनसंवाद पदयात्रेचे स्वागत केले. आमदार कुणालबाबा पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांचा सत्कार महाविद्यालयाचे चेअरमन प्रफ्लुलकुमार सिसोदे , व्हाय.चेअरमन अशोकराव पाटील, संचालक प्रा.सुरेश देसले, प्राचार्य डॉ. तुषारतात्या पाटील, यांनी केला. हयावेळी सर्व पदयात्रेस सहभागींना चहा व नाश्ता सोय करून दिली.सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन उपप्राचार्य विशाल पवार यांनी केले. दिपलक्ष्मी पतसंस्था वतीने प्रेरणा दिपक देसले, व्हायचेअरमन शब्बीर पठाण व संचालक मंडळाने ही आ.कुणालबाबा पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांचे स्वागत व शेतकरी संघर्ष समिती चेअरमन नाना चौधरी सह संचालक मंडळाने यांनी करुन पदयात्रेस सहभागी झालेत. -------------------------------------
अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे , देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने धुळे जिल्हयात चार सप्टेंबर ला काँग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीण चे लोकप्रिय आमदार कुणालबाबा पाटील व धुळे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली त्यात गावागावात शेतकरी, सर्वसामान्य, गोरगरीब, मोलमजुरी , तरुण , महिला , कामगार सह इतरांशी संवाद साधत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील ऐतिहासिक क्रांतीस्मारक स्थळ म्हणून साळवे फाटाजवळील क्रांतीस्मारकापासुन जनसंवाद जनसंवाद पदयात्रेस शुभारंभ सकाळी ६ ६ वाजता करण्यात आला. सुरुवातीला काँग्रेस चे प्रदेश सचिव युवराज करणकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर प्रार्थना झाली. बरोबर साडेसहा जनसंवाद पदयात्रेस सुरुवात केली. या जनसंवाद पदयात्रेस स्वतः आमदार कुणालबाबा पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर सोबत पदाधिकारी सहभागी झाले होते. सुरुवातीला साळवे, हातनुर, भडणे , शिंदखेडा शहरात भगवा चौक, स्टेशन रोड, शिवाजी चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर व सिद्धार्थ नगर , पोस्ट आफीस मशिद चौक, व्यापारी गल्ली , गांधी चौक, माळीवाडा जनता नगर, असा पहिला टप्प्यात सुमारे पदाधिकारी व कार्यकर्ते , शेतकरी ग्रामस्थ वीस किमी चे अंतर पायी चालत आले . तेथुन पाटण येथील कुलदैवत आशापुरी मातेच्या मंगल कार्यालय येथे विश्रांती घेतली. दुसऱ्या टप्प्यात चिरणे , कदाणे , बाभुळदे , महाळपुर , निशाणे , शेवटी खलाणे गावात निश्वास सोडला . प्रत्येक गावातील लोकभावना जाणुन घेऊन अनेक प्रश्न, समस्या, तक्रारी ग्रामस्थांनी सांगितल्यावर खरोखरच शिंदखेडा मतदार संघ अजुनही मागासलेल्या पैकी जसासतसा असे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे महाळपुर गावात ग्रामस्थ चिमुकली मुलेमुली, महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने शामकांत सनेर भारावुन गेले , त्यात एक एक समस्यांचा पाढा वाचायला सुरवात केली. चिमुकल्यांनी आमच्या शाळेला संगणक ची मागणी चे निवेदन दिले, महिलांची देखील उज्वला गस गेल्या एक वर्षापासून कागदपत्रांची पुर्तता केली देखील अद्याप मिळाली नाही, वीज लोडशेडिंग चा प्रश्न गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांना वरुण राजाने पाठ फिरवली असुन विहिरीत थोड्या प्रमाणावर पाणी शिल्लक असल्याने पिकांना काही अंशी जीवदान मिळु शकते पण वीजपुरवठा साथ देत नसल्याची खंत व्यक्त केली. भडणे पाठोपाठ हातनुर हया भागात प्रतिसाद चांगला दिसुन आला. शिंदखेडा शहरात तर जोरदार प्रतिसाद मिळत स्वतः आमदार कुणालबाबा पाटील व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी भाजीपाला, फळ खरेदी करणाऱ्यांकडून समस्या जाणुन घेत केंद्र व राज्य सरकार वर तिव्र नाराजी दाखवत आप आपली काँगेस च बरी होती. हयावेळी आमदार श्री. पाटील व श्री. सनेर यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारा शिंदखेडा मतदार संघातील ग्रामीण भागातील समस्या अजुनही सुटलेल्या नाहीत. एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पिकविमाचा स्वतः च्या करुन घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या दोन जिल्हयात एकाच दिवशी पिक विम्याची पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात विमानकंपन्याना हाताशी धरुन पदरात पाडून उर्वरित जिल्हे मात्र तसेच राहीले. वास्तविक शासनाच्या निकषानुसार एकाच वेळी पिक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असे असताना इतर जिल्हयावंर अन्याय आहे. म्हणून जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना घेराव घालुन धुळे जिल्हयाच्या शेतकरीनाही विमाची पंचवीस टक्के रक्कम तात्काळ मिळावी हयासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहोत. विजवितरण कंपनी वर शिंगाडे मोर्चा चा इशारा दिला. आपल्या अनेक समस्यांना न्याय देवु पण आम्हाला साथ , ताकद आहे. मणिपूर आदिवासी महिला विवस्त्र धिंड, नुकतीच जालना येथे झालेल्या मराठा आरक्षणावरुन पेटलेला वाद, महिला असुरक्षित, भरमसाठ महागाई ,बेरोजगारी , अशा अनेक समस्या पाहुन केंद्र व राज्य सरकार विनाशकाळाकडे जात असल्याने आपण मतदार राजा सत्ता पलटी करु शकते. शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांनी तर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना हाताशी धरुन आमचा बेटावद पट्टा वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने तालुका सुजलाम सुफलाम असल्याने दुष्काळी नाही असा अहवाल सादर करण्यात आला असुन शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याचा घणाघाती आरोप आमदार जयकुमार रावल यांच्या वर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केला. जनसंवाद पदयात्रेची सांगता खलाणे येथील प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर पदयात्रेस आमदार कुणालबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, इंटकचे महाराष्ट्र सचिव प्रमोद सिसोदे, माजी पं.स.सदस्य प्रा.सुरेश देसले , प्रकाश पाटील, शामकांत पाटील, आदिवासी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिपक दादा अहिरे, तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार , माजी जि. प.सदस्य हेमराज पाटील, शरद पाटील , पं.स. सदस्य राजेंद्र देवरे, प्रा. विशाल पवार,शिंदखेडा नगरपंचायत माजी प्र.नगराध्यक्ष दिपक देसले, मा.विरोधी पक्षनेते सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिनेश माळी,शब्बीर पठाण, समद शेख , गोटुआप्पा ठाकुर,किरण थोरात, अशोक बोरसे, इंंटकचे तालुकाध्यक्ष परिक्षीत देशमुख,आबा मुंडे, सोनु झालसे, चिराग माळी, महिला तालुका ध्यक्षा छायाताई पवार, भावना पवार , यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेस महाविकास आघाडीचे शिवसेना ( उबाठा) गट , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट सह विविध पक्ष, संघटनानी पाठिंबा देत सहभागी झाले होते.
0 Comments