मुंबई: समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यातील १०८ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले.
यात खानदेशातील नऊ शिक्षकांचा समावेश आहे. सन्मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार घोषित झाले.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांत धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांची वर्णी लागली आहे. यात धुळे जिल्ह्यातील निकुंभे शाळेतील गोकुळ त्र्यंबक पाटील, खंबाळे येथील आर. सी. पटेल विद्यालयातील संजय दगाजीराव पाटील व धोंगडेदिगर येथील वैशाली प्रभाकर सोनवणे या शिक्षकांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील बोडीपाडा येथील पंकज गोरख भदाणे, तळोदा येथील रवींद्र गुरव व लोंधा येथील रोहिणी गोकुळराव पाटील या शिक्षकांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील कंडारी येथील डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, भडगाव येथील सीमा भास्कर सैंदाणे, यावल येथील कल्पना देवीदास माळी व जवखेडे येथील छगन पंढरीनाथ या शिक्षकांना पुरस्कार घोषित झाले.
:वर्गवारीनुसार मिळालेल्या शिक्षकांची संख्या :
प्राथमिक शिक्षक - ३७
माध्यमिक शिक्षक - ३९
आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक - १९
आदर्श शिक्षिका - ०८
विशेष शिक्षक - ०२
दिव्यांग शिक्षक - ०१
स्काउट-गाइड - ०२
एकूण आदर्श शिक्षक ः १०८
0 Comments