शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - नमो नवमतदारांना जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय मतदार दिनी आनलाईन संबोधित करणार असल्याने शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व एम.एच.एस.एस कनिष्ठ महाविद्यालय येथे भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान
नवमतदारांना जनजागृती करण्यात आली. शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहरातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात नमो नवमतदारांना जनजागृती करण्यासाठी विविध महाविद्यालयात भेटीदरम्यान आनलाईन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधित भाषणातून लाभ घेऊन जास्तीत जास्त नवमतदारांनी दिलेल्या ऐप द्वारा नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.हयावेळी भाजपाचे विदयार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले , जनता विदया प्रसारक मंडळ अध्यक्ष मनोहर पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष अॅड. विनोद पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी ,माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, माजी शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी ,माजी विकासो चेअरमन दगा चौधरी ,उदय देसले, दादा मराठे , माजी नगरपंचायत बांधकाम सभापती चेतन परमार,भुपेंद्र राजपूत, बाळासाहेब गिरासे, जयसिंग गिरासे, गुलाब सोनवणे ,दिपक फुले, यांसह शहरातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. हयासाठी जनता हायस्कूल ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस.एस.बैसाणे ,पर्यवेक्षक उमेश देसले ,एस.ए.पाटील, जे.डी.बोरसे, एम.एच.एस.एस.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य टी. एन.पाटील ,उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक के.बी.अहिरराव ,प्रशासकीय अधिकारी एल.एम.सोनवणे , उमेश चौधरी , प्रा.दिपक माळी ,परेश देसले, प्रा. परमार ,प्रा.अजय माळी ,प्रा.परेश शहा आदिचे सहकार्य लाभले. बहुसंख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा नवमतदारांशी संवाद ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रसारण करण्यात आले.
मतदान करणे हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा संविधानिक व मुलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकांनी न चुकता बजावला पाहिजे. 18 वर्ष पूर्ण झालेले नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांनी आपल्या मनोगतातून नव मतदारांशी चर्चा करताना व्यक्त केले.
0 Comments