शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी- न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेच्या वापर करावा. जितक्या प्रभावीपणे आपण मराठी भाषेत व्यक्त होऊ शकतो तितक्या प्रभावीपणे इतर भाषेच्या वापर करून आपण व्यक्त होऊ शकत नाही. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही ए नाईक यांनी केले.
दि. 25 जाने रोजी शिंदखेडा न्यायालयात तालुका विधी समिती व वकील संघाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्रा. जे एस जोशी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.व्ही एस पवार, ॲड.वाय आर परमार मंचावर उपस्थित होते.
प्रा. जे एस जोशी यांनी मराठी भाषेचे महत्व विषद केले. मराठी भाषेला 2 हजार वर्षाचा इतिहास आहे. शेजारचा माणूस शेजारच्याशी बोलत नाही. व्हाट्स अँप, फेसबुक वर बोलण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्येक्ष संवाद हा दिवसेंदिवस कमी होत आहे. ॲड.व्ही एस पवार,ॲड. वाय आर परमार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड.व्ही एस पाटील यांनी केले.
यावेळी ॲड.बी व्ही सोनवणे, ॲड.बी झेड मराठे,ॲड.एस एन जाधव, ॲड.व्ही ए जाधव, ॲड.जे डी बोरसे, ॲड.एच बी अहिरराव,ॲड. एस सी मंगासे,ॲड.पी एस परदेशी,ॲड. सी एस कोळपकर, ॲड.शारदा मराठे,ॲड.अनिता पाटील, ॲड. पूजा कासार, ॲड. भूषण मराठे ,ॲड. शिरीष सोनवणे , क. लिपिक अनिल आहुजा उपस्थित होते. यशस्वितेसाठी विजय बाविष्कर, काझी दादा, मयूर राजपूत यांनी परिश्रम घेतले.
0 Comments