दोंडाईचा शहरातील नागरिकांना आता थोड्याच दिवसात लवखरच शुध्द पिण्याचे पाणी न.पा.च्या वाॅटर सप्लाईच्या माध्यमाने पिण्याचे पाणी मिळणार असुन त्यासांठी गांव भागातील गल्ली बोळात बारा महिन्यापूर्वी पाईप लाईन खड्डे खोदुन टाकण्यात आले असुन शहरातील काही भागांत राहीलेल्या पाईप लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर काम सुरू असुन त्यासांठी स्टेशन भागातील शिवाजी पुतळ्यापासुन मागच्या बाजुच्या सर्व स्टेशन भाग जुगनु चौक पर्यन्त फिल्टर पाण्याचे पाईप लाईन टाकण्यासाठी सर्व बुलडोजर लावुन पक्के रस्ते खोदुन चांगले रस्ताची खोदुन वाट लावलेली दिसत आहे नवीन पाईप टाकत असतांना अनेक नागरिकांचे घरगुती वापर करणारे जुनी पाईप लाईनचे नळ कनेक्शन तोडुन संबंधित नळ कनेक्शन धारकांना मोठी डोके दुखीच्या सामना करावा लागत आहे पाईप लाईन टाकताना बुलडोजर लावुन खोदलेले सर्वच चांगले रस्ते खराब करून ठेवले असुन संबंधित ठेकेदाराने रस्ते खोदले परंतु व्यवस्थित खड्डे खोदले ते बुजले नसुन सर्वत्र मातीचे ढिगार दगड़े वरतीच रोडावर पसरलेले म्हणुन ज्या भागातील रस्ते खोदले त्या रत्यावरून नागरिकांची दिवसभर भरीच रत्यावर वर्दळ राहत असुन दुचाकी वाहन चालवतांना सुद्धा मातीचे डिंगारावरुन गाडी चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असुन पायी चालताना सुद्धा डोळ्यांत अंजन टाकुनच चालावे लागते केव्हा पायाला ठेस लागेल व हात पायाला ईछा होईल हे सांगता येणार नाही तरी न.पा. मुख्यधिकारी यांनी ज्या ठेकेदारास संबंधित कामाच्या ठेका दिला असेल त्यांना खोदलेले रस्ते व्यवस्थित मजुर लावुन बुजने जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी या भागातील असंख्य नागरिकांची मागणी आहे. *श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*
0 Comments