Header Ads Widget

*जिल्हाधिकारी यांचा कृषि विभागासाठी एक दिवशीय बेटावदला नाविन्यपूर्ण कार्यक्रम*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी--
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत मंडळ कृषि अधिकारी,शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा कार्यक्षेत्रातील बेटावद येथे महात्मा गांधी


 राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत असिफ शे. लतीफ कुरेशी स.नं. 95/2 मध्ये पिक- केळी क्षेत्र 0.85 हे. वाण – ग्रँड-9 व अजिज शे. लतीफ कुरेशी स.नं. 95/1 मध्ये पिक- केळी क्षेत्र 0.85 हे वाण – ग्रँड-9 या वाणांची पाहणी केली व कृषि भूषण पुरस्कार प्राप्त श्री. प्रकाश भुता पाटील यांचे येथे ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम व बियाणे विक्री व्यवस्थापन प्रक्षेत्रास भेट देवुन  मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन मुल्यसाखळी विकास योजने अंतर्गत प्रकल्प संचालक, धुळे यांचे समन्वनाये  जिवनधारा फार्मस, प्रोडयुसर कंपनी, पडावद यांनी  रब्बी हंगामातील राबविलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे  श्री. अरुण ताराचंद पाटील, श्रीमती प्रतिभा ठाकरे, मदन कोडू परदेशी व शरद विक्रम पाटील रा.3 सर्व पडावद यांचे  रब्बी ज्वारी पिकाचे वाण- फुले सुचित्रा यापिकांची 0.40 हे. क्षेत्रावर केलेल्या लागवडीची पाहणी केली.
              तसेच मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत जिवनधारा फार्मस, प्रोडयुसर कंपनी, पडावद यांची औजार बँक पाहणी करुन सदर कंपनीचे बांधकाम सुरू असलेले  प्रक्रीया   गृहाची पाहणी करुन व शेतक-यांशी हितगुज केले व या प्रसंगी जिल्हाधिकारी, अभिनव गोयल यांनी वरील कार्यातील शेतकरी व कंपनी यांनी अधिकाधिक प्रगती साधावी असे सुचित केले. सदर  प्रसंगी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कुर्बान तडवी,  एन.एम. कोळपकर, प्रकल्प संचालक, धुळे .विनय बोरसे, प्रकल्प उपसंचालक, चौधरी, प्रकल्प उपसंचालक, एस.पी. तवर,  तालुका कृषि अधिकारी, नानाभाऊ अहिरे, मंडळ कृषि अधिकारी, व जिवनधारा फार्मस, प्रोडयुसर कंपनी, पडावद यांचे अध्यक्ष  श्यामकांत ठाकरे, सचिव व संचालक मंडळ व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमांच्या नियोजनासाठी अशोक वळवी, कृ. पर्यवेक्षक, अभय मगर कृषि सहायक,  प्रवीण राजपुत, कृषि सहायक, झाल्टे, कृषि सहायक, जिवन पिंपळे, कृषि सहायक, यांनी परीश्रम घेतले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव यांनी केले.

Post a Comment

0 Comments