Header Ads Widget

*"बेस्ट क्राईम रिपोर्टर " म्हणून दिव्य मराठीचे गणेश सूर्यवंशी पोलीस दलाकडून सन्मानित, धुळे जिल्ह्याचे 'रत्नपारखी' जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सन्मान....!*



---------------------------------
*धुळे-पारदर्शी-संविधानिक कारवाईमुळे धुळे जिल्ह्यात "डॅशिंग अधिकारी" म्हणून अल्पावधीत ओळख निर्माण केलेल्या पोलीस अधीक्षक मा.श्रीकांत धिवरे यांनी यंदापासून पत्रकारांना गौरवण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे.याच परंपरेतून "Best Crime Reporter on fild Award" चा प्रथम पुरस्काराने दिव्य मराठीचे उपसंपादक शोध पत्रकार श्री.गणेश सुर्यवंशी यांना श्रीमान आदरणी श्रीकांत धिवरे साहेब यांच्या शुभहस्ते  गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक मा. किशोरजी काळे,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमान एस. ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सचिन हिरे,श्री.साजन सोनवणे, जिल्हा गुन्हे अनवेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय शिंदे व संपूर्ण अधिकारी वर्ग मोठया संख्येने उपस्थितीत होता. गणेश सूर्यवंशी यांचा झालेला हा नेत्रादीपक सन्मान तमाम पत्र सृष्टीला गवसनी घालणारा आहे.. गणेशजी आपल्या शोध पत्रकारितेची आज या जिल्ह्याच्या रत्नपारखी पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन...🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🙏🙏*

Post a Comment

0 Comments