महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी उद्या सकाळी ७ वाजेपासून तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अखंड ११ तास मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनांच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. जेष्ठ नागरिक वयोवृध्द, अपंग व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करुन घेतले. त्यामुळे नक्की मतदानाची टक्केवारी वाढेल. परंतु जागृत मतदारांनी आळस न करता तूळस खाऊन लोकशाही मजबूत करण्यासाठी "पहिले मतदान फिर जलपान असा संकल्प करुन सकाळीच मतदान करुन घेतले पाहिजे जेवढे जास्त मतदान होईल तेवढीच लोकशाही मजबूत होईल. मतदान करणे प्रत्येक भारतीय नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. नेत्रदान, कन्यादान यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे मतदान असते आपले मत वाया जाऊ नये यासाठी कितीही महत्त्वाचे काम असेल तरी थोडासा वेळ काढून आधी मतदान करावे. त्यामुळे इतर मतदारांना मतदान करण्याची प्रेरणा मिळते यासाठी स्वता मतदान करुन मतदान सेल्फी पाॅंईट वरुन फोटो काढून घेता येईल. कदाचित तुम्हाला प्रवास करायचा असेल तरी प्रवास करण्यापुर्वी मतदान करुनच प्रवास करावा. मतदान करण्याची सुवर्णसंधी पाच वर्षांतून एकदाच मिळते हि सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका यासाठी आधी मतदान नंतर जलपान असा सर्वांनी विचार केला तर नक्की मतदानाची टक्केवारीत वाढ होईल. यातून महाराष्ट्रात जागृत मतदार आहेत असा संदेश इतर राज्यांना जाईल.....
0 Comments