Header Ads Widget

*शिंदखेडा तालुका एज्यकेशन ट्रस्ट ची उतुंग भरारी-तालुक्यात प्रगतीपथावर*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट च्या मिराबाई गर्ल्स हायस्कुल व एम एच एस एस हायस्कुल व कनिष्ठ महाविदयालय ़ अॅग्लो उर्दु हायस्कुल तसेच गायत्री माता प्राथमिक शाळा अशा शाखा असुन सर्व विदयार्थाना मोफत शिक्षण दिले जात आहे कै डॉ रमेश शिवदास देसले यांनी शिंदखेडा शहरासह परिसरातील विदयार्थीसाठी शिक्षणासाठी सोय उपलब्ध करुन दिली होती त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अल्पावधीतच न्यायालयाच्या संघर्षातुन लढाई जिंकत आबासाहेब स्वप्निल रमेश देसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच दुसरांदा देखील संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली संस्थेची सुत्रे हाती घेतल्यापासुन संचालक मंडळाच्या सहकार्याने विदयाथीसाठी विविध नवनवीन ज्ञानार्जनात भर पडावी म्हणुन सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत 
 *मिराबाई गर्ल्स हायस्कुल*
ही हायस्कुल केवळ विदयार्थीनी साठी असुन अत्यंत शिस्तीत विशेष लक्ष देणारा मुख्याध्यापक जे पी पाटील पर्यवेक्षक के के चौधरी व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर असा स्टॉफ लाभला आहे म्हणुन दरवर्षी हायस्कुलला दोनशेच्या वर नवीन प्रवेश होतात सुशोभित रंगरंगोटी असलेली इमारत विदयार्थीनीसाठी ज्ञानार्जनबरोबर मनोरंजनासाठी खेळणी उपलब्ध आहेत शिवाय 5 kw सोलर पॅनल 30 कॅम्युटर लॅब डिजीटल स्मार्ट वर्ग सुसज्य प्रयोगशाळा आर ओ फिल्टर पाणी दोन हजार लिटर तारेचे कंपाउड शेकडो वृक्षांची लागवड अशी सुविधा उपलब्ध असणारी शहरात नव्हे तालुक्यात पहिली शाळा ठरली आहे विदयार्थीनीसाठी विविध उपक्रमासह क्रिडा क्षेत्रात सहभागी करत नैपुन्य यश संपादन करुन तालुका जिल्हा राज्यस्तरावर निवड होत असते दहावी च्या निकालातही उतुंग भरारी राहिली आहे 
 *एम एच एस एस हाय व कनिष्ठ महाविदयालय* 
 प्राचार्य टी एन पाटील प्रशासकीय अधिकारी परेश रमेश देसले व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर असा स्टॉफ लाभला आहे सुशोभित रंगरंगोटी असलेली इमारत विदयार्थीनीसाठी ज्ञानार्जनबरोबर मनोरंजनासाठी खेळणी उपलब्ध आहेत शिवाय 5 kw सोलर पॅनल 30 कॅम्युटर लॅब डिजीटल स्मार्ट वर्ग सुसज्य प्रयोगशाळा  तारेचे कंपाउड शेकडो वृक्षांची लागवड अशी सुविधा उपलब्ध असणारी शहरात नव्हे तालुक्यात पहिली शाळा ठरली आहे विदयार्थीनीसाठी विविध उपक्रमासह क्रिडा क्षेत्रात सहभागी करत नैपुन्य यश संपादन करुन तालुका जिल्हा राज्यस्तरावर निवड होत असते दहावी च्या निकालातही उतुंग भरारी राहिली आहे 
 *अॅग्लो उर्दु हायस्कुल* 
स्वतंत्र मुस्लिम धर्मीयाकरीता हे संकुल उपलब्ध आहे मुख्याध्यापक के बी अहिरराव सह शिक्षक स्टॉफ सुसज्य आहेत आदर्श प्राथमिक विदयामंदिर व आनंद प्रि प्रायमरी इंग्लिस मेडीयम स्कुल शिंदखेडा देखील लहान मुलांसाठी आहे विदयार्थाच्या ज्ञानार्जनात भर पडावी हयासाठी अध्यक्षासह संचालक मंडळाचे विशेष लक्ष असल्याने तालुक्यात सदरील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट नावाजलेले असुन प्रगतीपथावर आहे विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विदयमान आमदार भाऊसाहेब जयकुमार रावल रोटरी क्लब शिंदखेडा जैन अलर्ट गृप वृक्ष संवर्धन समिती यासह अनेक संस्था शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते

Post a Comment

0 Comments