शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा शहरातील बी के देसलेनगर केदारेश्वर मंदिर परिसर सह विविध कॉलनीत चार नकली किन्नर फिरत असतांना बडजबरीने घरात घुसुन महिलावर्गाकडुन पैशाची मागणी करित होते नाही दिले तर शिवीगाळ करणे आज सकाळपासुन हा प्रकार सुरु असतांना सुगावा लागताच असली किन्नर ( तृतीयपंथीय ) किरण पार्वती जोगी शिंदखेडा विभाग प्रमुख सह मैना जोगी यांनी बी के देसलेनगर येथे सदरील चारही नकली किन्नरांना पकडले त्यांची चौकशी पडताळणी केली असता नकली असल्याचे आढळुन आल्याने रहिवाशी तरुणांनी धो धो धुतले त्यानंतर मुख्य रस्त्यावर धिंड काढत पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले त्यांच्यामागे तरुणांची एकच गर्दी दिसली पोलिस स्टेशनला हजर केल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी त्यांची सखोल माहिती विचारली असता आम्ही दोंडायचा येथे काही दिवसापासुन वास्तव्यास होतो रमेश दारासिंग साळुंखे ( वय -23 ) राज्या दारासिंग साळुंखे ( वय - 19 ) ईश्वर शिवा शिंदे ( वय -21 ) कुंदन शिवा शिंदे ( वय - 19 ) सर्व रा मोहिदपुर जि बुलढाणा अशी चार नकली किन्नर ( तृतीयपंथीय ) नावे असुन त्यांच्यावर 109 कलम प्रतिबंधक कायदयाच्या आधारे तहसिलदार अनिल गवांदे यांच्यासमोर हजर करुन समज देवुन अटी शर्थीवर सोडुन देण्यात आले हया प्रकारामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले असुन अशा अनोळखी व्यक्ती विक्री करणारे फिरस्तींना घरात प्रवेश देवु नये शिवाय वस्तु खरेदी करु नये संशयित आढळल्यास त्वरीत शिंदखेडा पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी शहरासह तालुक्यातील जनतेला केले आहे नकली किन्नर सापडल्याने शहरात खमंग चर्चेला उधाण आले होते
0 Comments